Jalindar Supkar: कुणी खाल्ला कैद्यांचा फराळ? कैद्यांच्या दिवाळी फराळात भ्रष्टाचार? राजू शेट्टींच्या आरोपांनी खळबळ

Who Ate the Inmates' Diwali Sweets: हगवणे प्रकरणात चर्चेत आलेल्या पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांच्या अडचणीत वाढ झालीय.. त्यांनी कैद्यांच्या दिवाळीच्या फराळात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आलाय.. मात्र हा आरोप कुणी केलाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....
Raju Shetti
Raju Shetti saam tv
Published On

पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे चर्चेत आलेले पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर नव्या वादात अडकलेत.. जालिंदर सुपेकर कारागृह महानिरीक्षक असताना त्यांनी कैद्यांच्या दिवाळी फराळमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप राजू शेट्टींनी केलाय..

एवढंच नाही तर नामांकित कंपन्यांचे दर लावून सुपेकर आणि अमिताभ गुप्तांनी लोकल मार्केटमधून कैद्यांसाठी फराळ खरेदी केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आलाय.. तर हा फराळ घोटाळा 5 कोटींचा असल्याचा आरोप शेट्टींनी केलाय..तर शेट्टी फक्त आरोप करुन थांबले नाहीत तर त्यांनी घोटाळ्याचे पुरावेच दिलेत...

हाराष्ट्राच्या कारागृहात फराळ घोटाळा

फराळ दर

काजूकतली- 1200 रु. किलो

रवा पेढा- 600 रु. किलो

अनारसे- 600 रु. किलो

म्हैसूर पाक- 590 रु. किलो

चकली- 570 रु. किलो

डिंक लाडू- 570 रु. किलो

रवा लाडू- 570 रु. किलो

करंजी- 500 रु. किलो

खरंतर वैष्णवी हगवणेचा हुंड्याच्या छळामुळे मृत्यू झाला.. या प्रकरणी शशांक हगवणे याचे मामा जालिंदर सुपेकर चर्चेत आले... मात्र हेच जालिंदर सुपेकर आता आरोपांच्या घेऱ्यात अडकलेत... पाहूयात सुपेकरांवर कोणते आरोप करण्यात आलेत?

सुपेकरांनी कैद्याकडून 300 कोटी मागितल्याचा सुरेश धस यांचा आरोप

बँकेच्या लॉकरमधून सोनं आणि पैसे हडपल्याचा सावकाराच्या वकिलाचा आरोप

अमरावतीच्या गणेश गायकवाडच्या जामिनासाठी 550 कोटी रुपये मागितल्याचा आरोप

हगवणे बंधूला अवैधरित्या शस्त्र परवाना दिल्याचा आरोप

हगवणेच्या सुपेकर मामावर घोटाळ्याचे आरोप होतायत.या आरोपांच्या मालिकेनंतरही जालिंदर सुपेकरांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावलेत.. एवढंच नाही तर रेशन, कॅन्टीन साहित्य खरेदीसह दिवाळी फराळ खरेदी प्रक्रिया शासन नियमानुसार केल्याचा दावाही सुपेकरांनी केलाय... त्यामुळे आता पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची सखोल चौकशी करुन दूध का दूध आणि पानी का पानी करण्याची गरज आहे....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com