धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने देण्याची वेळ आलीय, शालीनी ठाकरेंची शिवसेनेवर खोचक टीका

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालीनी ठाकरे शिवसेने विरोधात मैदानात उतरल्या आहेत.
Aditya Thackeray, uddhav Thackeray and shalini Thackeray
Aditya Thackeray, uddhav Thackeray and shalini Thackeraysaam tv
Published On

मुंबई : महाराष्ट्रात 'आवाज कुणाचा' अशी डरकाळी फोडणाऱ्या शिवसेनेला एकनाथ शिंदे गटाने (Eknath Shinde) बंडाळी करुन जोरदार धक्का दिला. भाजपच्या मदतीनं राज्यात शिंदे-फडणवीस सरकारही स्थापन झालं. पंरतु, ही सत्तासंघर्षाची लढाई एवढ्यावरच न थांबता थेट सुप्रीम कोर्टात (supreme court) पोहोचली आहे. शिंदे गटाने शिवसेनेचे पक्षचिन्ह असलेल्या धनुष्यबाणावरही नेम लावला असून यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाला पत्र देण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालीनी ठाकरे शिवसेने विरोधात (shalini Thackeray) मैदानात उतरल्या आहेत. ठाकरे यांनी शिवसेनेवर खोचक टीका केली आहे. रेल्वे इंजिन भाड्याने द्या, म्हणून उपदेश देणार्‍यांवर धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने देण्याची वेळ आली आहे, असा टोला त्यांनी शिवसेनेसह पक्षप्रमुख (uddhav Thackeray) उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.

Aditya Thackeray, uddhav Thackeray and shalini Thackeray
मोठी बातमी : सोनिया गांधींची ईडी चौकशी, काँग्रेसने महाराष्ट्रात रान पेटवलं

राज्यात शिंदे-फडणवीस सरकारला मनसेने पाठिंबा दर्शवल्यानंतर शिवसेना विरुद्ध मनसे असा राजकीय सामना रंगला आहे. एकीकडे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) निष्ठा यात्रेच्या माध्यमातून शिवसैनिकांना मार्गदर्शन करुन शिवसेनेचा पाया पुन्हा भक्कम करताना दिसत आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेंनीही मनसेच्या महासंपर्क अभियानाची धुरा हातात घेतली आहे. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध मनसे अशी जोरदार लढत होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Aditya Thackeray, uddhav Thackeray and shalini Thackeray
Presidential Election Result 2022 : 'अशी' होते राष्ट्रपती निवडणुकीची मतमोजणी, वाचा सविस्तर

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com