Raj Thackeray: मुंबईच्या वेशीवरील टोलनाक्यांवर १५ दिवसांत कॅमेरे लावणार; आणखी काय बदल व्हावेत? राज ठाकरेंनी सविस्तर सांगितलं

मंत्रालयात सेल उभा करुन व्हिडिओग्राफीवर लक्ष ठेवली जाईल.
Raj Thackeray
Raj ThackeraySaam TV
Published On

Raj Thackeray:

राज्यात पुढच्या १५ दिवसांत मुंबईतील इंट्री पॉइंट्वसवर सरकारचे कॅमेरे लागतील. तसेच मनसे पक्षाचे देखील कॅमेरे लागतील. मंत्रालयात सेल उभा करुन व्हिडिओग्राफीवर लक्ष ठेवले जाईल. भुयारी मार्ग आणि उड्डाणपूलांचा आयआयटीकडून सर्वे केला जाणार आहेत, टोलनाक्यांच्या प्रश्नांवर असे बदल होणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं आहे.

Raj Thackeray
Thane Ring Road Project: ठाणेकरांचा प्रवास वेगवान अन् सुलभ होणार; प्रवास सुकर करणारा ठाणे रिंग मेट्रो प्रकल्प नेमका आहे तरी कसा?

राज्यातील टोलनाक्यांवर मनसेने आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली. या बैठकीत टोलनाक्यांपासून नागरिकांना दिलासा मिळावा आणि प्रवास सुखकर व्हावा यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील यावर चर्चा झाली. शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी सर्व बदल सविस्तर सांगितले आहेत. सरकारसह मनसेकडून देखील मुंबई एन्ट्री पॉइंट्सवरील ५ टोलनाक्यांवर शौचालय आणि प्रथमोपचाराची सुविधा देण्यात येणार आहे.

मुंबईच्या ५ एन्ट्री पॉइंट्सवरील टोलनाक्यांवर होणारे बदल

उद्यापासून सर्व टोलनाक्यांवर व्हिडिओग्राफी सुरू होणार आहे.

टोलनाक्यांवर शौचालय आणि प्रथमोपचाराची सुविधा असणार आहे.

मंत्रालयात सेल उभा करुन व्हिडिओग्राफीवर लक्ष ठेवली जाईल

लोकांना होणाऱ्या त्रासासाठी एक नंबर दिला जाईल, त्यावरू प्रवाशांना तक्रार करता येणार आहे.

भुयारी मार्ग आणि उड्डाणपूल यांचे आयआयटीकडून सर्वे करण्यात येणार आहेत.

ठाण्यात चार चाकीवर लागलेला टोलवाढ रद्द करण्यासाठी सरकारला वेळ हवा आहे.

येलो लाईनच्या पुढे गाड्यांची रांग लागली तर टोल घेणार नाही.

हे मुद्दे राज ठाकरेंनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत मांडले.

टोल नाका परिसरात नागरिकांना मासिक पास दिले जातील.

राज्य चालवण्यासाठी महसूल लागतो. मात्र विविध मार्गाने लोक पैसे भरतात. याबाबत मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी बोलणार असल्याचं राज ठाकरेंनी यावेळी म्हटलं. रस्ते खराब असले तर ती जबाबदारी टोलची असते. असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

Raj Thackeray
Road Accidents: राज्यात रस्ते अपघातात मोठी वाढ, ७ महिन्यात ८ हजारांहून अधिक मृत्यू; पुण्यातील आकडेवारी धडकी भरवणारी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com