
शिवतीर्थावरचा गणेशोत्सव यंदा आगळावेगळा ठरतोय.. कारण यंदा गणरायाने टोकाचे मतभेद असलेल्या आणि दुरावलेल्या राजकीय नेत्यांना एकत्र आणलंय.याच भेटीगाठींमुळे राज ठाकरेंचं शिवतीर्थ गजबजून गेलंय..
तब्बल 20 वर्षांनी उद्धव ठाकरे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी गेले.. याच भेटीत दोन्ही भावांमध्ये बंद दाराआड चर्चाही झाली आणि राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा युतीच्या चर्चांनी जोर धरला.. मात्र हिंदीसक्तीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर राज ठाकरेंनी टीकेचे बाण सोडलेत...
मात्र, राजकीय कटुता विसरुन उद्धव ठाकरेंपाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिवतीर्थ गाठत गणरायाचं दर्शन घेतलं...त्यानंतर दोन्ही भावांनी एकत्रच राहावं, अशी अपेक्षा व्यक्त केलीय.. मात्र संजय राऊतांनी फडणवीसांना कोपरखळी मारलीय...
हे फक्त ठाकरे आणि फडणवीसांपुरतंच मर्यादित नाही... विधानसभा निवडणुकीत कटुता निर्माण झालेल्या एकनाथ शिंदेच नाही तर थेट अमित ठाकरेंविरोधात निवडणूक लढवणाऱ्या सदा सरवणकरांनाही गणरायानं शिवतीर्थावर आणलंय..
मात्र शिंदेंनी मनातच ठेवलेलं बंद दाराआडचं राज मुंबई महापालिकेचं आहे का? याबरोबरच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याही राज ठाकरेंच्या घरी झालेल्या भेटीगाठीमागे गणेशोत्सवाचं कारण होतं की मुंबई महापालिकेचं राजकारण? याचीही चर्चा रंगलीय..
पण एक मात्र नक्कीच म्हणता येईल. राज ठाकरेंचा यंदाटा बाप्पा हा वजनदारच. कारण राज ठाकरेंकडे ना सत्ता, ना आमदार, ना नगरसेवक तरीही या राज ठाकरेंच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी एक-दोन नव्हे तर ३-३ आजी माजी मुख्यमंत्री शिवतीर्थावर हजर असल्यानं चर्चा तर होणारंच.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.