Mahrashtra Politics: राज आले, मविआ फुटली, ठाकरेंना काँग्रेस राष्ट्रवादीही घेरणार?

Congress vs Thackeray Brothers: लोकसभा, विधानसभा एकत्र लढणारी महाविकास आघाडी मात्र राज ठाकरेंच्या एण्ट्रीनेच फुटलीय... राज ठाकरेंच्या एण्ट्रीनं काँग्रेसनं वेगळी चूल मांडली असली तरी त्यावरुन आरोप प्रत्यारोप रंगलेत...
Raj Thackeray’s entry triggers fresh political turmoil as MVA allies turn against each other ahead of Mumbai civic elections.
Raj Thackeray’s entry triggers fresh political turmoil as MVA allies turn against each other ahead of Mumbai civic elections.Saam Tv
Published On

भाजपसारखा महाशक्तीच्या विरोधात लढणाऱ्या विरोधी पक्षाची मोट महापालिका निवडणूकांच्या तोंडावर आता सैल पडू लागलीये. मविआतील एक एक पक्ष स्वत:च्या अस्तित्वासाठी आता मात्र मित्रपक्षांच्या विरोधातच कडक मोर्चेबांधणी करत असल्याचं दिसतंय. ठाकरे बंधूंची युती होण्याची शक्यता दिसतानाच कॉग्रेसनं थेट आपला शरद पवारांना साद घातली आहे.

विधानसभेच्या निवडणूका मविआ म्हणून लढणाऱ्या कॉग्रेंसने ठाकरे बंधूंना घेरण्यासाठी राष्ट्रवादीची साथ घ्यायचं ठरवलंय. त्यामुळे शरद पवार पारंपारिक मित्रपक्षासोबत जातात की मित्राच्या मुलांना साथ देतात हे पाहणं देखील महत्वाचं आहे. याचवेळी काँग्रेसनं ठाकरेंच्या युतीवर आपली खंत ही बोलून दाखवलीये.

मुंबईत काँग्रेसनं आता ठाकरेंच्या विरोधातच एल्गार पुकारलाय. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या मैदानात ठाकरे बंधूंचा सामना आता आणखीन आव्हानात्मक असणार आहे. त्यांच्यापुढे मोठ्या पक्षांचे आव्हान असून ठाकरेंसाठी मुंबईची निवडणूक ही अस्तित्वाची लढाईच असेल

1. भाजप

2. शिवसेना शिंदे गट

3. राष्ट्रवादी अजित पवार गट

4. काँग्रेस

5. राष्ट्रवादी शरद पवार गटा

6. वंचित बहुजन आघाडी

7. समाजवादी पक्ष

8. एमआयएम

कारण एकट्या ठाकरेंबंधू समोर भाजप, शिंदेगट, अजित पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, वंचित, समाजवादी आणि एमआयएम सारख्या 8-8 पक्षांचे आव्हान असणार आहे.

महापालिका निवडणुका आल्या आणि राज्यात भरभक्कम असलेल्या युती आणि आघाडींचे तुकडे तुकडे झाले. गेल्या निवडणूकांच्या रणांगणात खांद्याला खांदा लावून लढणारे पक्ष आता मात्र एकमेंकांच्या विरोधात बाह्या सरसावू लागलेत. त्यामुळे एकट्या राज ठाकरेंच्या एन्ट्रीनं मविआचे मित्र पक्ष हे चहोदिशांनी विखुरल्याचं दिसतयं. म्हणून राजकारणात कधीच कोणीच कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो या वाक्याला पुन्हा आधार मिळाल्याचं या राजकीय घडामोडींवरुन दिसतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com