Raj Thackeray Arrest Warrant : मोठी बातमी! राज ठाकरेंविरोधात अटक वॉरंट जारी, नेमकं काय आहे प्रकरण?

Arrest Warrant Against Raj Thackeray : 16 वर्षापूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून महामंडळाच्या बस जाळपोळ आणि तोडफोड केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता. त्यावरून निलंगा न्यायालयाने अटक वॉरंट जारी केलं आहे.
Raj Thackeray Arrest Warrant
Raj Thackeray Arrest WarrantSaam Digital
Published On

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना निलंगा येथील दुसरे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी शुक्रवारी (नाॕनबेलेबल) पकड वाॕरंट जारी केले आहे. यामुळे राज ठाकरे यांना निलंगा न्यायालयात हजर रहावे लागणार आहे. दरम्यान यापूर्वी ही, काही वर्षांपूर्वी राज ठाकरे हे ,याच प्रकरणी निलंगा न्यायालयात हजर झाले होते. 16 वर्षापूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून महामंडळाच्या बस जाळपोळ आणि तोडफोड केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता. ...

सन 2008 मध्ये निलंगा येथील मनसे कार्यकर्त्यांनी उदगीर मोड इथे राज्य परिवहन महामंडळाच्या बसची जाळपोळ केली होती. याप्रकरणी निलंगा पोलिस ठाण्यात 8 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये राज ठाकरे यांचा हि ,समावेश होता. यापूर्वी निलंगा न्यायालयाने जामिन रद्द केल्याने त्यांना निलंगा येथील न्यायालयात हजर रहावे लागले होते.

वकीलांनी राज ठाकरे यांना प्रत्येक तारखेला निलंगा न्यायालयात येणे शक्य नसल्याने हे प्रकरण वर्ग करण्याची विनंती देखिल न्यायालयाकडे केली होती. त्यावेळी त्यांना जामिनही दिला होता. मात्र दिलेल्या तारखेला हजर राहात नसल्यामुळे न्यायालयाने पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक वाॕरंट जारी केल आहे.. दरम्यान या प्रकरणातील तत्कालीन मनसेचे तालुका प्रमुख ,आणि इतर 3 जण शुक्रवारी न्यायालयात हजर झाले होते. त्यांच काढलेले वाॕरंट विना तामील झाले होत, त्यामुळे न्यायालयाने चौघांचा जामीन रद्द केला होता.पुन्हा न्यायालयाने दंड लावला आणि नवीन जामीन देण्याचा आदेश चौघांना दिला होता.

Raj Thackeray Arrest Warrant
Maharashtra Politics : महायुतीत अजित पवार नकोसे? भाजप-शिंदे गटाकडून दादा टार्गेट? वाचा...

रितसर वकिलामार्फत काल जामीन मिळाला आहे. मात्र राज ठाकरे आणि मनसेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख अभय सोळूंके हजर राहत नसल्यामुळे त्यांना पुन्हा (नाॕन बेलेबल) अटक वाॕरंट जारी केल ,असल्यामुळे पोलिसांना त्यांना निलंगा न्यायालयात हजर करावे लागणार आहे. येथील न्यायालयाने राज ठाकरे आणि अभय सोळूंके यांना हजर करा असे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सहा वर्षानंतर राज ठाकरे यांना निलंगा न्यायालयात हजर रहावे लागणार आहे. चिथावणीखोर भाषण दिले म्हणून ते या प्रकरणातील 8 वे आरोपी आहेत.

Raj Thackeray Arrest Warrant
Maharashtra Elections: महायुतीचं जागावाटप कुठपर्यंत आलं?, बैठकीत जे घडलं ते अजित पवारांनी थेट सांगितलं!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com