पराभवानंतर राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर, मनसेमध्ये लवकरच होणार फेरबदल

Raj Thackeray Reaction After MNS Election Defeat: महापालिका निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर आले असून मनसेमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत.
MNS chief Raj Thackeray during a party meeting amid discussions on organisational overhaul after election defeat
MNS chief Raj Thackeray during a party meeting amid discussions on organisational overhaul after election defeatSaam Tv
Published On

पुणे महापालिकेत एकेकाळी 29 नगरसेवक असलेल्या मनसेला यंदाच्या निवडणुकीत मात्र एकही नगरसेवक निवडून आणण्यात यश आलेलं नाही. त्यामुळे पुण्यातील शहर कार्यकारणीमध्ये लवकरच बदल होण्याचे संकेत आता पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिले आहेत. निवडणुकीमध्ये जय पराजय होत असतात.

पुणे महापालिका निवडणुकीत यंदा आम्ही पहिल्यांदाच शिवसेनेसोबत युतीमध्ये लढलो. पराभव आम्ही मान्य केला असून लवकरच त्याबाबत आत्मचिंतन केलं जाईल. तसेच राज साहेब आणि शर्मिला वहिनी यांच्याशी बोलल्यानंतर शहरात बदल दिसेल अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी दिली आहे.

MNS chief Raj Thackeray during a party meeting amid discussions on organisational overhaul after election defeat
लोकलमध्ये धक्का लागल्याचा राग, कॉलेज प्रोफेसरच्या पोटात चाकू खुपसला, आरोपीला १२ तासांत अटक

निवडणुकीच्या प्रचाराची रणनीती आखायला आम्ही कमी पडलो. ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध धनकशक्ती होती असं असलं तरी सुद्धा येत्या काळात आदरणीय राज साहेब लवकरच पुण्यात येतील आणि बैठक घेतील अशी माहिती त्यांनी दिली. फक्त शहराध्यक्ष पदाबाबत विचारू नका कारण पक्षात येत्या काळात अनेक बदल झालेले दिसतील असं ही संभूस म्हणाले.

MNS chief Raj Thackeray during a party meeting amid discussions on organisational overhaul after election defeat
Accident News : पुण्यात हिट अँड रनचा थरार! मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेला भरधाव कारने उडवलं

यंदाच्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आल्याने मनसेचे इंजिन जोरात धावेल असा राजकीय अंदाज वर्तवला जात होता. नाशिक जिल्हा हा खरतर मनसेचा बालेकिल्ला होता. दोन वेळा महापालिकेवर मनसेची सत्ता होती. त्यामुळे राज आणि उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये संयुक्त सभा घेत प्राचराचे नारळ फोडले होते. मात्र या ठिकाणी देखील फक्त 1 जागा मनसेची निवडून आल्याने दारुण परभवाला सामोरे जावे लागले आहे. मुंबईमध्ये फक्त 6 जागांवर समाधान मानावे लागले. यामुळे आता मनसे लवकरच पक्षामध्ये फेरबदल करणार असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com