IMD Rain Alert: विदर्भात पुढचे तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

IMD Rain Alert: नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहनही हवामान विभागाने केलं आहे.
Monsoon 2023
Monsoon 2023SaamTv

IMD Rain Alert: देशभरातील लोकांना कडाक्याचा उन्हाचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रातही तापमानाचा पाराही गेल्या काही दिवसांपासून चढता आहे. उष्णतेने हैरान झालेल्या नागरिकाना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

पुढील तीन दिवसांत विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सोबत विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे पण वाहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहनही हवामान विभागाने केलं आहे. (Latest Marathi News)

भारतीय हवामान खात्याने येत्या काही दिवसांत भारताच्या अनेक भागात हलक्या ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागराच्या काही भागात नैऋत्य मोसमी पावसाने आगेकूच केल्याने येत्या तीन दिवसांत पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

अंदमानात मान्सूनचं आगमन

कालच म्हणजे 20 मे रोजी दक्षिणपूर्व बंगालचा उपसागर, निकोबार आणि दक्षिण अंदमान समुद्राच्या काही भागात मान्सून दाखल झाला आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली. तर येत्या तीन-चार दिवसांत मान्सून दक्षिण बंगालच्या उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान, निकोबारच्या आणखी काही भागांमध्ये पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

Monsoon 2023
Monsoon Update: अंदमानात मान्सून धडकला; 'या' तारखेला होणार महाराष्ट्रात आगमन

महाराष्ट्रात 9 ते 15 जूनपर्यंत मान्सूनचं आगमन

दुसरीकडे स्कायमेट या खासगी संस्थेच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात (Maharashtra) मान्सूनचं आगमन 9 ते 15 जूनपर्यंत होण्याची शक्यता आहे. तर मुंबईत 15 जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यंदा भारतामध्ये सरासरी 96 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com