सिंधुदुर्ग- रत्नागिरीला पावसाचा फटका; मुंबई गोवा महामार्ग ठप्प

ratangiri sindhudurg rain updates
ratangiri sindhudurg rain updates
Published On

सिंधुदुर्ग/रत्नागिरी : राज्यातील बहुतांश भागांना पावसाचा फटका बसला आहे. सातारा, काेल्हापूर जिल्ह्याप्रमाणेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांतील पूल पाणी खाली गेले आहेत. यामुळे अनेक ठिकाणच्या पूलांवरील वाहतुक बंद करण्यात आली आहे. (rain-updates-ratnagiri-sindhudurg-water-increased-bridges-closed-for-tranportation)

सिंधुदुर्गात पावसाचा जोर पहाटेपासून आहे. जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पाऊस वाढू लागला आहे. कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण या भागामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. काही नद्या धोक्याच्या पातळी पर्यत पोहचल्या आहेत. समुद्रला देखील मोठ्या प्रमाणात उधाण आहे. त्यामुळे किनारपट्टीला रहाणाऱ्या नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

राजापूरात पाणीच पाणी

बुधवारी रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे राजापूरच्या जवाहर चौकात पुन्हा पाणी भरले आहे. राजापूरला पुन्हा एकदा पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेले आहे राजापूर मधल्या कोदवली आणि अर्जुना नदिन धोक्याची पातळी ओलांडल्याने राजापूरमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. राजापूरच्या बाजारपेठेमध्ये आता पाणी शिरलेय. असाच पाऊस ratangiri sindhudurg rain updates पडत राहिला तर आणखी राजापूरला पुन्हा एकदा पुराचा वेढा लागू शकतो. त्यामुळे व्यापारी वर्गांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण पसरले आहे.

भुईबावडा घाटातील अवजड वाहतूक आजपासून बंद

भुईबावडा घाट मार्गातून सुरू असलेल्या अवजड वाहतूकीमुळे घाटरस्ता धोकादायक बनत चालला आहे. खबरदारी म्हणून भुईबावडा घाटातील अवजड वाहतूक काही काळासाठी बंद करावी असे पत्र सार्वजनिक बांधकामच्या उपअभियंत्यांनी कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना दिले आहे.

प्रांताधिका-यांनी गंभीर दखल घेत भुईबावडा घाट मार्गातून अवजड वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान यापूर्वीच करूळ घाट रस्ता खचल्याने येथील वाहतुक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरील अवजड वाहतूक फोंडा आणि आंबोली मार्गे वळविण्यात आली आहे.

ratangiri sindhudurg rain updates
NDRF चे दाेन पथक कोल्हापूरात; एक शिराेळला हाेणार रवाना

रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गाला मुसळधार पावसाचा फटका

लांजा अंजणारी पुलावरील वाहतूक बंद

रत्नागिरीतील बावनदी पुल वाहतुकीसाठी बंद

चिपळूणचा बाहाद्दूर शेख पुल वाहतुकीसाठी बंद

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com