
रायगड - जिल्ह्यात महाडजवळ तळीये गावावर दरड कोसळली Collapse आहे. ढगफुटी सारख्या पावसामुळे Rain डोंगराच्या पायथ्याशी आणि दुर्गम भागामध्ये असलेल्या तळीये taliye गावावर मोठी दरड कोसळली आहे. दरड कोसळून यामध्ये जावपास ३२ घरे बाधित झाली असून त्याखाली ७२ जण गाडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर या गावामध्ये 400 ते 500 लोक अडकून पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गंभीर बाब म्हणजे गावामध्ये पोहोचण्याची सुद्धा काही सोय नाही. काल संध्याकाळी घडलेल्या या घटनेमध्ये अनेकांच्या मृत्यूची भीती देखील व्यक्त केली जात आहे. तर संपूर्ण गावालाच पाण्याचा वेढा असल्यामुळे गावापर्यंत मदत पोहचवणं हे अशक्य होत आहे. काल संध्याकाळपर्यंत एनडीआरएफ तसेच कोस्ट गार्ड हे पुराच्या पाण्यात अडकल्याने प्रत्यक्ष गावात बचावकार्याला वेळ लागणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.रात्री उशिरापर्यंत मदत पोहोचू शकलेली नाही.
पूरस्थितीमुळे गावातील सर्व रस्ते बंद असल्याने एनडीआरएफची टीमही तेथे पोहोचू शकलेली नव्हती. महाड, पोलादपूर आणि कर्जत या तालुक्यांना पुराचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. तळीये गावावर काल संध्याकाळी सातच्या सुमारास दरड कोसळली. मात्र नेटवर्क नसल्याने तेथून काहीही माहिती मिळू शकली नाही. गावात जाणाऱ्या रस्त्यांवर ९ फुटांपर्यंत पाणी असल्याने ते कमी झाले की बोटींतून पोहोचण्याचा प्रयत्न करू, असे एनडीआरएफच्या पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. अधून मधून पावसाचा जोर कायम असल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.