Raigad News: मुंबई-गोवा महामार्गावर रिक्षा -टेम्पोचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

Mumbai -Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावरील माणगावजवळ रिक्षा आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले आहेत.
Raigad News: मुंबई-गोवा महामार्गावर रिक्षा -टेम्पोचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू
Mumbai -Goa Highway AccidentSaam TV

सचिन कदम, रायगड

मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai -Goa Highway) भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. रिक्षा आणि टेम्पोमध्ये समोरा समोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू तर दोघे जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेआहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई -गोवा महामार्गावर माणगावमध्ये अपघाताची ही घटना घडली आहे. रिक्षा आणि टेम्पोची समोरासमोर धडक झाली. रिक्षा माणगाववरुन इंदापूरच्या दिशेने जात होती. तर आयशर टेम्पो मुंबईवरून माणगावच्या दिशेने जात होता. त्याचवेळी माणगाव तालुक्यातील कशेणे गावाच्या हद्दीत दोघांची समोरा समोर धडक झाली. हा अपघात इकता भीषण होता ही ३ महिलांचा जागीच मृत्यू झाला.

Raigad News: मुंबई-गोवा महामार्गावर रिक्षा -टेम्पोचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू
Parbhani News: परभणीत तरुण शेतकऱ्याची आत्महत्या, दुष्काळाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल

या अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींमध्ये रिक्षा चालक आणि दीड वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. जखमींना तात्काळ माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. तर मृतदेह देखील शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे. या अपघातामध्ये रिक्षाचा चक्काचूर झाला आहे.

Raigad News: मुंबई-गोवा महामार्गावर रिक्षा -टेम्पोचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू
Pune Porsche Accident Case : २०२५ पर्यंत 'ती' महागडी कार रस्त्यावर उतरवण्यास मनाई; त्या अल्पवयीन मुलाला या वर्षी मिळणार वाहन परवाना?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये नंदा पवार (३५ वर्षे), शेवंती कोळी (४० वर्षे), संगिता वाघमारे (२० वर्षे) या तिघींचा मृत्यू झाला आङे. हे सर्वजण माणगावच्या कशेणे येथे राहणारे होते. तर या अपघातामध्ये मयुरी वाघमारे (दीड वर्षे) आणि मथीन राऊत (राहणार पनवेल) या रिक्षा चालकाचा मृत्यू झाला आहे. दीड वर्षाच्या मुलीच्या आईचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Raigad News: मुंबई-गोवा महामार्गावर रिक्षा -टेम्पोचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू
Mumbai News : भाजप आमदारासमोरच समर्थकांंची BMC कंत्राटदाराला मारहाण; VIDEO बघा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com