Mumbai-Goa Highway : प्रवाशांनो लक्ष द्या! मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी 'या' वाहनांना 'नो एन्ट्री'; कारण...

Mumbai-Goa Highway News : शिमग्यासाठी गावी गेलेले चाकरमानी मुंबईला परतत आहेत. या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Mumbai-Goa Highway
Mumbai-Goa HighwaySaam Tv
Published On

सचिन कदम, साम टीव्ही, प्रतिनिधी

Raigad News : होळी, शिमग्याचा सण महाराष्ट्रभर साजरा केला गेला. कामानिमित्त मुंबई, पुणे अशा महानगरांमध्ये स्थानिक झालेले अनेक चाकरमानी शिमगोत्सवासाठी कोकणात निघाले होते. आता सण साजरा करुन चाकरमानी परतीचा प्रवास करणार आहेत. हा प्रवास सुखकर व्हावा यासाठी प्रशासनाने विशेष सोय केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उद्या रविवारी १६ मार्च रोजी मुंबई-गोवा महामार्गावर २४ तास अवजड वाहनांना बंदी असणार आहे. यासंबंधित अधिसूचना रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून जारी करण्यात आली आहे. वाहतूक बंदीतून इंधन, स्वयंपाकाचा गॅस, भाजीपाला, औषधे, ऑक्सिजन अशा जीवनाश्यक वस्तूंना वगळण्यात आले आहे.

उद्या मुंबई-गोवा महामार्गावर दुपारी १२ वाजल्यापासून ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत अवजड वाहतूक बंद राहणार आहे. होळीसाठी कोकणात गेलेल्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी अवजड वाहतूकीवर बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

Mumbai-Goa Highway
Accident News : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, ब्रेक फेल अन् एसटी बस रस्त्यावर घासत थेट दरीत

होळी, शिमगा सण तसेच सलग आलेली सुट्टी यामुळे मागील काही दिवसांपासून मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होती. शिमग्याला गावाला जाणाऱ्या चाकरमान्यांच्या गाड्यांच्या रांगा महामार्गावर लागल्या होत्या. हा त्रास पुन्हा होऊ नये यासाठी प्रशासनाने अधिकची खबरदारी घेतली आहे.

Mumbai-Goa Highway
Aurangzeb Status : १४ जणांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवलं, सोलापुरात तणाव; पोलीस अॅक्शन मोडवर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com