
सचिन कदम, साम टीव्ही, प्रतिनिधी
Accident : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. भोर-महाड मार्गावर वरंध घाटात एसटी बसला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ही एसटी बस सुनेभाऊ येथून महाडकडे येत होती. बसचे ब्रेक निकामी झाल्याने बसचा अपघात झाल्याची माहिती बसचालकाने दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बस सुनेभाऊहून महाडला जायला निघाली होती. त्याच दरम्यान वरंध गावाच्या वरच्या बाजूला असलेल्या वळणावर एसटी बसचे ब्रेक निकामी झाली. त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगात बस रस्त्यावर घासत सुमारे ५० फुट खोल दरीत कोसळली. दुपारी ३ च्या सुमारास हा अपघात घडला. बस दरीतल्या एका झाडाला अडकल्याने मोठी दुर्घटना टळला असे लोक म्हणत आहेत.
या अपघातात हनुमंत लक्ष्मण दिघे (बसचालक), सुभद्रा सोपान धनावडे, राजेश नधुराम साळुंखे, काशीबाई ज्ञानदेव जाधव, ज्ञानदेव पांडुरंग जाधव, सुनिता सुरेश चौधरी, साईज्ञा संकेत मालुसरे, आशा रघुनाथ मालुसरे, रघुनाथ नारायण मालुसरे, दगडाबाई दत्ताराम पांडे, तुळशीबाई राजाराम यादव, मंदा हैबत पवार, सुवर्णा सुधीर धनावडे, कांचना दिलीप मालुसरे, सुप्रिया संभाजी धनावडे, नीलिमा चंद्रकांत पोळ, अथर्व चंद्रकांत पोळ असे प्रवासी जखमी झाले आहेत.
सर्व प्रवाशांसह चालक आणि कंडक्टर यांनच्यावर महाडच्या ट्रॉम केअर युनिटमध्ये उपचार सुरु आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. अपघाताची माहिती मिळताच मंत्री भरत गोगावले यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. महाड एसटी प्रशासनाने देखील घटनास्थळी भेट दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.