सचिन कदम, प्रतिनिधी
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी मुंबईच्या शिवाजी पार्कवर शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले. रायगडच्या महाडमध्येही असाच प्रकार समोर आला असून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमावरुन दोन्ही गटात जोरदार राडा झाला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महाडमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने आले असून दोन्ही गटात जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. छत्रपती शिवाजी चौकामध्ये हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम घेण्यावरुन या वादाला सुरूवात झाली.
यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून नवे- जुने, गद्दार, निष्ठावंत म्हणत हायहोल्टेज ड्रामा झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. या बाबतची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या राड्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळत असून पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
शिवाजी पार्कमध्येही जोरदार राडा..
दरम्यान, शिवाजी पार्क (Shivaji Park) येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले. गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) हे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर दर्शन घेण्यासाठी आले होते. यावेळी हा वाद झाला. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.