पतसंस्‍थेतील कोट्यावधीचा घोटाळा उघड; राष्ट्रवादीच्या नेत्यावर गुन्हा दाखल

श्रीवर्धनमधील सामान्‍य नागरीकांनी आपल्‍या ठेवी या पतसंस्थेत ठेवल्‍या होत्‍या.
Raigad News
Raigad Newsसचिन कदम
Published On

सचिन कदम -

रायगड : रायगड जिल्ह्यातील (Raigad) श्रीवर्धनमधील जनसेवा नागरी पतसंस्थेमध्ये कोट्यवधी रूपयांच्‍या घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीचे (NCP) स्थानिक नेते तथा श्रीवर्धन नगरपालिकेचे माजी नगराध्‍यक्ष नरेंद्र भुसाणे (Narendra Bhusane) यांच्‍यासह एकूण ८ जणांविरोधात श्रीवर्धन पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

नरेंद्र भुसाणे, सचिन कोसबे, सुप्रेश दवटे, संदेश सावंत , चेतन गुरव, पराग चौगुले, स्‍वप्‍नील भुसाणे आणि सिद्धेश भुसाणे अशी आरोपींची नावे आहेत. पतसंस्‍थेत घोटाळा झाल्‍याचे समोर येताच शहरासह तालुक्यात खळबळ उडाली असुन त्‍यानंतर पतसंस्‍थेचे लेखा परीक्षण करण्‍यात आले.

पाहा व्हिडीओ -

लेखा परीक्षण केल्यानंतर पतसंस्थेत अपहार झाल्‍याचे स्‍पष्‍टपणे समोर आल्‍यामुळे काल संध्याकाळी श्रीवर्धन पोलीस ठाण्‍यात (Srivardhan Police Station) गुन्हा दाखल करण्‍यात आला. या पतसंस्‍थेत श्रीवर्धनमधील सामान्‍य नागरीकांनी आपल्‍या ठेवी ठेवल्‍या होत्‍या परंतु यातील सुमारे ४ कोटीहून अधिक रकमेचा अपहार करण्‍यात आला असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी ठेवीदारांकडून करण्यात येत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com