Nilwande Dam : निळवंडेच्या पाण्यासाठी गांधी जयंती दिनी शेतकऱ्यांचे उपोषण

Ahmednagar News : निळवंडेच्या पाण्यासाठी गांधी जयंती दिनी शेतकऱ्यांचे उपोषण
Nilwande Dam
Nilwande DamSaam tv
Published On

सचिन बनसोडे 

राहुरी (अहमदनगर) : अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्याची काम अद्याप अपूर्ण आहे. हे काम त्वरित पूर्ण करून शेतकऱ्यांना (Farmer) पाणी मिळावे. यासाठी राहुरी (Rahuri) तालुक्यातील तांभेरे गावातील राम मंदिरात निळवंडी कृती समितीचे उपाध्यक्ष दादासाहेब पवार यांनी महात्मा गांधी जयंतीपासून उपोषण सुरू केले आहे. (Latest Marathi News)

Nilwande Dam
Manmad News: विंचूरला कांदा व्यापाऱ्यांचा रस्ता रोको; कांदा व्यापाऱ्याने अपशब्द वापरल्याचा निषेध

निळवंडे धरणावर १८२ गावांचे पिण्याचे पाणी आरक्षित करावे, प्रस्तावित कालव्यांमध्ये येणाऱ्या अडचणी दुर कराव्यात, डाव्या आणि उजव्या कालवे हे बंदिस्त ऐवजी उघड्या पद्धतीने कराव्यात आदी मागण्यांसाठी दादासाहेब पवार यांनी उपोषण सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करून सदर प्रश्न मार्गी लावावा आशा मागण्या करण्यात आल्या. 

Nilwande Dam
Kapil Patil News: काँग्रेससारखी संस्कृती भाजपची नाही; मंत्री कपिल पाटील यांचा नाना पटोलेंना टोला

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा 

निळवंडे धरणाच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या उपोषणास स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच परिसरातील लाभधारक शेतकऱ्यांनी पाठींबा दिलाय. तसेच मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही; असा इशारा उपोषणकर्ते दादासाहेब पवार यांनी दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com