Maharashtra politics : धनंजय मुंडेंनंतर महायुतीला आणखी एक धक्का? कोटींच्या घोटाळ्यात विखे अडकणार?

Maharashtra farmer loan fraud : धनंजय मुंडेनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर ९ कोटींच्या आर्थिक घोटाळ्याचे आरोप; शेतकऱ्यांच्या मदत कर्जाचा गैरवापर आणि कारखान्यातील अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.
Vikhe-Patil
Radhakrishna Vikhe-PatilSaam Tv
Published On

Radhakrishna Vikhe Patil news : धनंजय मुंडेंनंतर महायुतीला मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या रुपाने मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे... कारण विखे पाटलांनी शेतकऱ्यांना कोटींचा चुना लावल्याचा आरोप आहे.. हा आरोप कुणी केलाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

महायुती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांची यादी काही संपताना दिसत नाही. माजी मंत्री धनंजय मुंडे, जयकुमार गोरे , माणिकराव कोकाटे आणि आता प्रचंड मोठं साम्राज्य असणारे राधाकृष्ण विखे पाटील.... पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात आर्थिक घोटाळा झाल्याचं समोर आलंय. ९ कोटीच्या अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कारखान्याच्या तत्कालिन संचालक असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह 54 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलाय.नेमकं काय आरोप करण्यात आले आहेत ते पाहूया.

2004 ते 2010

बनावट कागदपत्राद्वारे शेतकऱ्यांचे नावे मदतकर्ज

2004 ते 2007 मध्ये फसवणूक केल्याचा आरोप

सभासद शेतकऱ्यांना मंजूर कर्जाची रक्कम दिली नाही

कर्जमाफी योजनेंतर्गत कर्ज माफीही लाटली

Vikhe-Patil
Bhendwal Ghatmandni : पंतप्रधान तणावात, देशावर मोठे संकट, युद्धाचे सावट, 'भेंडवळ'ची भविष्यवाणी!

या अपहार प्रकरणात विखे पाटलांसह माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के , बँक ऑफ इंडियाचे तत्कालीन विभागीय व्यवस्थापक, युनियन बँकेचे तत्कालीन विभागीय व्यवस्थापक यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. विखे पाटलांवर होणाऱ्या आरोपामुळे विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय.तर दुसरीकडे विखे पाटलांनी मात्र आपण कुठल्याही चौकशीला सामोरं जायला तयार असल्यांच म्हटलं आहे.

Vikhe-Patil
Rule Change : बँक ते गॅस सिलिंडर...आजपासून बदलणार ५ मोठे नियम, तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

आठ आठवड्यात याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वाच्च न्यायालयाने दिलेत. त्यामुळे राज्य सरकार या प्रकरणात मुंडेंना जो न्याय दिला त्याच न्यायानं विखेंचीही चौकशी करणार का आणि विखेंनाही मंत्रीपद सोडावं लागणार का? याविषयाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com