Maharashtra Politics: राजकीय घडामोडींना वेग; शरद पवारांचा अजित पवारांना फोन, दोघांमध्ये काय बोलणं झालं?

Sharad Pawar and Ajit Pawar Discuss: शरद पवार यांनी आज थेट अजित पवार यांना फोन करून पुरंदर विमानतळ प्रकल्पात अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली.
politics
politicsSaam
Published On

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बराच काळ दुरावा होता. मात्र, ठाकरे बंधूनंतर पवार काका पुतणे एकत्र येणार का? याकडे सर्वांचेच लक्ष होतं. दोघेही सध्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. तसेच एकमेकांशी चर्चाही करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज थेट अजित पवार यांना कॉल केला. त्यांनी कॉलवर पुरंदर विमानतळ प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या अडचणींवर चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे.

शरद पवार पुणे दौऱ्यावर असताना, पुरंदर तालुक्यातील शेतकरी त्यांच्या निवासस्थानी भेटण्यासाठी आले होते. त्यांनी विमानतळ प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या शरद पवार यांच्यासमोर मांडल्या. यानंतर शरद पवारांनी अजित पवारांना फोन केला. तसेच त्यांच्यासमोर शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. यावेळी अजित पवार यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या विषयाकडे लक्ष देत असल्याची माहिती शरद पवार यांना दिली.

politics
Beed: 'दादा कराडला तू का बोललास? माफी माग' मुंडे टोळीने आणखी एकाला बेल्टनं झोडलं? VIDEO व्हायरल

या चर्चेमुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासन गांभीर्याने लक्ष देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पुरंदर विमानतळाच्या प्रस्तावामुळे शेतकऱ्यांचा विरोध अद्याप कायम असून, शेतकरीवर्ग अजूनही निषेध करीत आहेत.

politics
CJI Gavai: संघर्षमय प्रवास अन् सरन्यायधीशांच्या आईंना अश्रू अनावर, पदराने डोळे पुसत पाहिलं लेकाचं कौतुक

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश मिळालं. तर, शरद पवार यांच्या गटाला मोठा फटका बसला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये दोन्ही गट पुन्हा एकत्र येतील का? या चर्चेला उधाण आलं आहे. तसेच आता पवार काका- पुतण्यांमध्ये होत असलेल्या बैठका आणि चर्चांमुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्यात युती होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

politics
Sanjay Raut: 'अमित शहांना फोन करू का?' ईडीकडून अटक होण्याआधी एकनाथ शिंदेंचा फोन; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com