पुण्यात शालार्थ आयडी घोटाळ्यात बडा मासा गळाला लागलाय... शालार्थ आयडीसाठी 1 लाख रुपयांची लाच घेताना शिक्षण उपसंचालक कार्यालयातील उपनिरीक्षक रावसाहेब मिरगणेच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ मुसक्या आवळल्यात.... मात्र या घोटाळ्याची मोडस ऑपरेंडी कशी होती?
खरंतर 2016 पासून सोलापूर जिल्ह्यात एक सहशिक्षिका माध्यमिक शाळेत विनावेतन काम करत होत्या... त्यांचा शालार्थ आयडी मंजूर झाल्यानंतर त्यांना वेतन चालू होणार होते... त्यासाठी 6 महिन्यांपूर्वीच प्रस्ताव पुण्याच्या विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात सादर करण्यात आला होता.. तो प्रस्ताव मंजूर करण्यासाठीच उपनिरीक्षकाने 1 लाख रुपयांची लाच मागितली. मात्र तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार केल्यानं शिक्षण उपनिरीक्षकाचा भांडाफोड झाला... मात्र हा झालेला पर्दाफाश दुर्दैवी असल्याची अजब प्रतिक्रिया शिक्षण उपसंचालकांनी दिलीय.
यानंतर साम टीव्हीने शालार्थ घोटाळ्याच्या मुळाशी जाण्याचा निर्णय घेतला..आणि या घोटाळ्याचं रेटकार्ड साम टीव्हीच्या हाती लागलंय....
शालार्थ आयडीचं रेटकार्ड
मुख्याध्यापकाची मान्यता - 2 लाख रू
पूर्णवेळ शिक्षक मान्यता- 5 लाख रू
माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक मान्यता- 1 ते 2 लाख रू
निवड श्रेणी मान्यता- 50 हजार रू
खरंतर साम टीव्हीने नागपूरमध्ये 580 बोगस शालार्थ आयडीच्या माध्यमातून सरकारी तिजोरी लुटीचा पर्दाफाश केला होता...अशाच रॅकेटचा लातूर, बीड, मुंबईसह, नाशिक, जळगाव, धुळ्यातही खासगी शाळा आणि मुख्याध्यापकांच्या माध्यमातून पर्दाफाश झालाय. हे कमी होतं की काय आता पुण्याच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयात रावसाहेब मिरगणेचा काळा कारनामा उघड झालाय...याची एसआयटी चौकशी सुरू असल्याचं शिक्षण आयुक्तांनी सांगितलंय.
बोगस शालार्थ आयडीच्या फॅक्टरीचा पर्दाफाश करण्यासाठी सरकारने पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना केली खरी... मात्र त्यानंतरही लुटीचा गोरखधंदा कायम सुरु आहे... शालार्थ आयडी घोटाळ्याची कीड मुळासकट नष्ट कऱण्याची गरज आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.