MPSC चा निकाल, गुलालाची उधळण, सर्व रूममेट बनले अधिकारी

From One Room to Class-One: पुण्यातल्या MPSC करणाऱ्या मित्रांनी एक नवी सक्सेस स्टोरी आपल्या नावावर केलीय.. रुममेट असणाऱ्या या मित्रांनी थेट MPSCच्या माध्यमातून अधिकारी होण्याचं स्वप्न सत्यात उतरवलयं... त्यामुळे एक कॉलेज, एक वर्ग, एकच रूम असा प्रवास असणाऱ्या मित्रांची ही स्टोरी अधिकारी होण्यापर्यंत कशी पोहचली?
Pune MPSC roommates celebrate success after cracking MPSC — Suraj Padwal, Aniket Sakhare, and Suraj Gadhve, all now government officers.
Pune MPSC roommates celebrate success after cracking MPSC — Suraj Padwal, Aniket Sakhare, and Suraj Gadhve, all now government officers.Saam Tv
Published On

MPSCचा निकाल लागला...आणि पुण्यातील रुममेट असणाऱ्या मित्रांच्या एका सक्सेस स्टोरीनं अनेकाचं लक्ष वेधलं... जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन असेल तर सामान्य घरातील मुलगाही प्रशासनात उच्च पदावर पोहोचू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे कराडचा सुरज पडवळ...कारण अनिकेत आणि सूरज गाढवे या दोन मित्रांकडून प्रेरणा घेऊन सुरज पडवळनं यावेळी MPSCतून क्लास वन अधिकारी पद मिळवलयं..

विशेष म्हणजे, सुरजच्या यशामागे त्यांच्या रूममेट मित्रांची मोठी प्रेरणा आहे. त्यांच्या सर्व रूममेट मंडळींपैकी अनेक जण आता विविध सरकारी विभागात अधिकारी म्हणून काम करतायत...त्यातच सुरज गाढवे आणि अनिकेत साखरे या मित्रांनीही MPSCतून चांगलचं यश मिळवलयं...

मुळात "मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा" असायला हवा.. असं आपण नेहमीच म्हणतो... मात्र पुण्यातल्या या MPSC करणाऱ्या मित्रांची ही गोष्ट इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणारी आहे...रुममेट अधिकारी झाले आणि त्याच्या प्रेरणेतून सुरजनं आणखी मोठा पल्ला गाठत.. थेट क्लास वन अधिकारी पद मिळवलं...त्यामुळे जिद्द, मेहनत आणि मित्रांची साथ असेल तर कोणताही ध्येय अशक्य नाही, हेच या यशोगाथेतून सिद्ध होतं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com