Pune News : पुण्यात पेट्रोलऐवजी पाणी, नागरिकांची वाहनं अर्ध्या रस्त्यात बंद; शहरातील 'या' पंपावरचा प्रकार

Pimpri Chinchwad HP Petrol Pump Water : वाहन चालकांच्या वाहनांमध्ये ८० टक्के पाणी आणि फक्त २० टक्के पेट्रोल भरून दिल्याने वाहन बंद पडू लागली आहेत. दुचाकी वाहन बंद पडल्यानंतर दुचाकी वाहन चालकांना अक्षरशः त्यांची वाहन उलट करुन पेट्रोलच्या टाकीतून पाणी बाहेर काढावं लागत आहे.
Pimpri Chinchwad HP petrol pump
Pimpri Chinchwad HP petrol pumpSaamTV
Published On

पुणे : पिंपरी चिंचवड शहरातील एका पेट्रोल पंपवर पेट्रोल डिस्पेन्सर मशीनमधून चक्क पेट्रोल ऐवजी पाणी भरून देण्यात आलं आहे. त्यामुळे HP कंपनीच्या पेट्रोल पंपावर आलेले दुचाकी वाहन मोठ्या प्रमाणात बंद पडत असल्याने वाहन चालविणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. शाहूनगर येथील एचपी कंपनीच्या भोसले पेट्रोल पंपावर हा प्रकार घडला आहे.

वाहन चालकांच्या वाहनांमध्ये ८० टक्के पाणी आणि फक्त २० टक्के पेट्रोल भरून दिल्याने वाहन बंद पडू लागली आहेत. दुचाकी वाहन बंद पडल्यानंतर दुचाकी वाहन चालकांना अक्षरशः त्यांची वाहन उलट करुन पेट्रोलच्या टाकीतून पाणी बाहेर काढावं लागत आहे. पेट्रोल पंपाच्या टाकीची योग्य प्रकारे निगा न राखल्यामुळे टाकीमध्ये पाणी गळती झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Pimpri Chinchwad HP petrol pump
Pune News: पुणे तिथे काय उणे! महिलेने घरात पाळल्या तब्बल ३५० मांजरी, कारवाईसाठी गेलेला आरोग्य अधिकारी चक्कर येऊन पडला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com