Gram Panchayat Reservation : उत्तर पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर महिलाराज; चार तालुक्यांतील ६२८ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण

Khed Pune News : राज्यातील निवडणूक लागणाऱ्या ग्रामपंचातींसाठी २०२५ ते २०३० या पाच वर्षांसाठी आरक्षण काढण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि खेड या तालुक्यांसाठी आरक्षण काढण्यात आले
Gram Panchayat Reservation
Gram Panchayat ReservationSaam tv
Published On

खेड (पुणे) : पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि खेड या चार तालुक्यांमध्ये ग्रामपंचायत सरपंच पदासाठी पंचवार्षिक कालावधीसाठी आरक्षणाची सोडत पार पडली. या सोडतीतुन उत्तर पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये महिलाराज प्रस्थापित होणार आहे. चार तालुक्यातील ६२८ पैकी तब्बल ३१६ ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच नेमले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

राज्यातील निवडणूक लागणाऱ्या ग्रामपंचातींसाठी २०२५ ते २०३० या पाच वर्षांसाठी आरक्षण काढण्यात येत आहे. राज्यातील बहुतांश ग्रामपंचातींचे आरक्षण काढण्यात आले असून पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि खेड या तालुक्यांसाठी आरक्षण काढण्यात आले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या देखरेखखाली सदर आरक्षण सोडत प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली. या आरक्षणामुळे ग्रामीण भागातील महिलांना नेतृत्वाची संधी मिळून समाजाच्या सर्वांगीण विकासात त्यांचा सहभाग अधिक प्रभावी होणार आहे. 

Gram Panchayat Reservation
Sarpanch Reservation : मावळातील निम्म्या ग्रामपंचायतीमध्ये महिलाराज; १०३ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी निघाले आरक्षण

निम्म्या ग्रामपंचातीत महिलांना संधी 

महिलांचे स्थानिक प्रशासनात वावर वाढेल, निर्णयप्रक्रियेतील सहभाग बळकट होईल आणि महिला सक्षमीकरणाच्या दिशेने ही सोडत एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. गाव बदलायचा असेल, तर स्त्रीला संधी द्या हे विधान यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. आगामी काळात ग्रामीण विकासात महिलांची ठसा उमटवणारी भूमिका अधिक गडद होणार हे नक्की. कारण जवळपास निम्म्या ग्रामपंचातींमध्ये महिलांना संधी देण्यात आली आहे. 

Gram Panchayat Reservation
Shirdi Crime : ऑनलाईन बुकिंग करून हॉटेलवर गैरकृत्य; पोलिसांची धाड टाकत कारवाई, महिलेची सुटका तर दोघेजण ताब्यात

तालुकानिहाय महिला सरपंच आरक्षण 
पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यातील ६२८ ग्रामपंचायतींची आरक्षण काढण्यात आले आहे. यातील ३१६ ग्रामपंचातीवर महिला सरपंच सात. यामध्ये जुन्नर तालुका: १८३ पैकी ९२ ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव, आंबेगाव तालुका: १४३ पैकी ७२ ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव, शिरूर तालुका: ११५ पैकी ५८ ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव व खेड तालुका: १८७ पैकी ९४ ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com