Sasoon Hospital : 'ससून'चा कारभार अधांतरीच; १० महिन्यांपासून रुग्णालयात प्रभारी अधिष्ठाता

Pune News : पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये गेल्या दोन वर्षांत गैरप्रकारांची मालिका सुरू होती. त्यामुळे एकही व्यक्ती स्थिरपणे अधिष्ठाता यांच्या खुर्चीत टिकून राहिली नाही. मे महिन्यापासुन रुग्णालयात प्रभारीराज सुरु आहे.
Sasoon Hospital
Sasoon HospitalSaam tv
Published On

पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांसाठी आधार असलेल्या ससून सर्वोपचार रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण उपचारांसाठी येतात. मात्र, या रुग्णालयातील कारभार अधांतरीच असल्याचा अनुभव याठिकाणी येत आहे. ससून रुग्णालयात गेल्या १० महिन्यांपासून रुग्णालयाचे कामकाज प्रभारी अधिष्ठात्यांकडे आहे. या ठिकाणी अधिष्ठाची पूर्णवेळ नेमणूक अद्याप करण्यात आलेली नाही. 

पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये गेल्या दोन वर्षांत गैरप्रकारांची मालिका सुरू होती. त्यामुळे एकही व्यक्ती स्थिरपणे अधिष्ठाता यांच्या खुर्चीत टिकून राहिली नाही. अंमली पदार्थ तस्करीचा सूत्रधार ललित पाटील पलायन प्रकरणात नोव्हेंबर २०२३ मध्ये तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना पदावरून हटविण्यात आले. त्यानंतर तातडीने डॉ. विनायक काळे यांच्याकडे अधिष्ठाता पदाची सुत्रे देण्यात आली. 

Sasoon Hospital
Buldhana Crime : शेतीच्या वाद उफाळला; कुटुंबावर प्राणघातक हल्ला, तीनजण गंभीर जखमी

मे महिन्यानंतर दोन बदलले

अधिष्ठाता डॉ. काळे यांच्या कार्यकाळात पोर्श अपघात प्रकरणातील आरोपीचे रक्त नमुने बदलण्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी ससूनमधील न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉ. अजय तावरे यांना अटक करण्यात आली. याच प्रकरणात गेल्या वर्षी मे महिन्यात डॉ. काळे यांना अधिष्ठाता पदावरून हटवून सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. डॉ. काळे यांच्यानंतर ससूनच्या प्रभारी अधिष्ठातापदी डॉ. चंद्रकांत म्हस्के यांची गेल्या वर्षी मे महिन्यात नेमणूक करण्यात आली. 

Sasoon Hospital
Sangli : इस्लामपूरमध्ये २८ किलो गांजा जप्त; तिघांना ताब्यात घेत साडेआठ लाखाचा मुद्देमाल जप्त

प्रभारी कारभार सुरूच 

डॉ. म्हस्के यांच्याकडे आधीपासून बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाचा कार्यभार होता. त्यांच्याकडे ससूनच्या अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. विशेष म्हणजे एकाच महिन्याच्या आत जूनमध्ये डॉ. म्हस्के यांच्याकडील अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला. त्या जागी मुंबईतील जे. जे. वैद्याकीय महाविद्यालयातील अस्थिव्यंगोपचार विभागाचे प्रमुख डॉ. एकनाथ पवार यांच्याकडे ससूनचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com