Varandha Ghat Closed: वरंधा घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद, नेमकं कारण काय?; या पर्यायी मार्गाचा करा वापर

Pune-Raigad Varandha Ghat Closed: वरंधा घाटाची सुरक्षेच्या अनुषंगाने आज प्रशासनाकडून पाहणी करण्यात आली. त्यानंतर प्रशासनाने वरंधा घाट वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
Varandha Ghat Closed: वरंधा घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद, नेमकं कारण काय?; या पर्यायी मार्गाचा करा वापर
Varandha Ghat ClosedSaam Tv
Published On

पुण्यातून भोर मार्गे महाडला जाणारा वरंधा घाट (Varandha Ghat) वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पावसामुळे वरंधा घाट खचल्याची घटना घडली त्यामुळे हा धोका लक्षात घेता सुरक्षेच्या कारणास्तव हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली आहे. खबरदारी म्हणून वरंधा घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद (Varandha Ghat Closed) करण्यात यावा याबाबत पुणे जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवण्यात आला होता.

त्यानंतर वरंधा घाटाची सुरक्षेच्या अनुषंगाने प्रशासनाकडून पाहणी करण्यात आली. त्यानंतर प्रशासनाने वरंधा घाट वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यामध्ये घाट खचण्याचा आणखी मोठा धोका आहे. याचमुळे सुरक्षेच्या कारणास्तवर वरंधा घाट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुण्यातून भोर मार्गे महाडच्या दिशेने जाणाऱ्या वरंधा घाटाची सुरक्षेच्या अनुषंगाने प्रशासनाकडून आज पाहणी करण्यात आली. घाटातील खचलेला भाग आणि संभावना दरड ठिकाणांची प्रशासनाकडून पाहणी करण्यात आलीय. खबरदारी म्हणून वरंधा घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्याचा प्रस्ताव पुणे जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलाय.

त्यामुळे वरंधा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली होती. त्यानंतर हा घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता या मार्गावरून कोकणात जाणाऱ्यासाठी प्रवास करणाऱ्यांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

Varandha Ghat Closed: वरंधा घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद, नेमकं कारण काय?; या पर्यायी मार्गाचा करा वापर
Pune Bus Accident: महामार्ग ओलांडतांना पादचाऱ्याला ST बसने उडवलं, ४१ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू

दरम्यान, पुण्यावरुन कोकणात जाण्यासाठी वरंधा घाट हा सोपा मार्ग होतो. पण आता वरंधा घाट बंद होणार असल्यामुळे याठिकाणावरून प्रवास करणाऱ्यांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे त्यांना आता लांब मार्गाने प्रवास करावा लागणार आहे.

कोकणातून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना आता राजेवाडी फाटा-माणगाव-निजामपूर रोड-ताम्हाणी घाट-मुळशी पिरंगुट पुणे आणि पोलादपूर आंबेनळी घाट वाई मार्गे पुणे या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. तसेच कोकणामधून कोल्हापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना राजेवाडी फाटा-पोलादपूर-खेड-चिपळुण-पाटण-कराड- कोल्हापूर या मार्गाने प्रवास करावा लागणार आहे.

Varandha Ghat Closed: वरंधा घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद, नेमकं कारण काय?; या पर्यायी मार्गाचा करा वापर
Pune News: पुणे हादरलं! अल्पवयीन मुलीवर बापासह, चुलता अन् भावाकडून लैंगिक अत्याचार, हडपसर परिसरातील घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com