Mulshi News : पौड पोलिसांकडून कोर्टाची दिशाभूल; आरोपींच्या वकिलाचा दावा, पोलीस प्रशासनाला कोर्टाची नोटीस

Pune Mulshi News : व्हॉट्सअ‍ॅप कॉलच्या रेकॉर्डिंगच्या आधारे सदरची कारवाई करण्यात आल्याचे पौड पोलिसांनी नमूद केले. मात्र, संशयित आरोपी मोहितेसह अन्य काहींवर सासवड पोलिस ठाण्यात एका जमीन व्यवहाराशी संबंधित गुन्हा दाखल
Pune Mulshi News
Pune Mulshi NewsSaam tv
Published On

मुळशी (पुणे) : शस्त्रसाठा बाळगून तो चालविण्याचा सराव केल्याच्या आरोपावरून अटक झालेल्या आरोपीने पौड पोलिसांवर न्यायालयाची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी  वकिलांनी देखील याबाबत दावा करत कारवाईची मागणी केली आहे. त्यानंतर न्यायालयाने पोलिस प्रशासनाला नोटीस बजावली आहे. यामुळे पोलीस प्रशासनावर ठेवण्यात आलेल्या ठपक्यात नेमके सत्य काय? हे समोर येणे बाकी आहे.  

मुळशी येथील जंगलात सात ते आठ पिस्तुलांचा वापर करून गोळीबाराची चाचणी घेण्यात आली होती. या आरोपाखाली ८ जुलैला गणेश मोहिते याला येरवडा कारागृहातून अटक करण्यात आली होती. दरम्यान व्हॉट्सअ‍ॅप कॉलच्या रेकॉर्डिंगच्या आधारे सदरची कारवाई करण्यात आल्याचे पौड पोलिसांनी नमूद केले होते. मात्र, संशयित आरोपी मोहितेसह अन्य काहींवर सासवड पोलिस ठाण्यात एका जमीन व्यवहाराशी संबंधित गुन्हा देखील दाखल आहे. 

Pune Mulshi News
Budhwar Peth : बुधावर पेठेत वेश्यागमनासाठी जाणाऱ्यांचा पाठलाग करायचं अन् लुटायचे, पुण्यातील धक्कादायक प्रकार

एकाच घटनेवर दोन गुन्हे दाखल 

या प्रकरणाशी संबंधित आरोप नोंदवून पौड पोलिसांनी नवीन शस्त्र कायद्यान्वये संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सासवड येथील प्रकरणात एकास अटकपूर्व जामीन मिळाला असून, दुसऱ्याएकाला नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. या सर्व बाबी आरोपीचे वकील प्रसन्नकुमार जोशी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. एकाच घटनेवर आधारित दोन गुन्हे वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे, सासवड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा संदर्भ वापरत पौड ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

Pune Mulshi News
Shocking News : मैत्रिणीनेच रचला कट, १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

आरोपींच्या वकिलाचा कोर्टात दावा 

यात आरोपी गणेश मोहितेची पोलिस कोठडी वाढविण्याची मागणी करताना पौड पोलिसांनी अन्य सहआरोपी यांचा पत्ता शोधायचे कारण दिले. प्रत्यक्षात त्यापैकी एकाला अटकपूर्व जामीन, तर दुसरा आरोपी नोटिशीनुसार सासवड पोलिस ठाण्यात नियमितपणे हजेरी लावत आहेत. ही माहिती पौड पोलिसांनी न्यायालयापासून लपविली असल्याचा दावा बचाव पक्षाचे वकील प्रसन्नकुमार जोशी यांनी केला. दरम्यान पोलिसांविरोधात कारवाईची मागणी केली आहे. या अर्जावर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी १४ जुलैला पोलिस प्रशासनास नोटीस बजावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com