धक्‍कादायक..तीन महिन्यात सहा हजाराहून अधिक अपघात; ३०८० नागरिकांचा मृत्यू

धक्‍कादायक..तीन महिन्यात सहा हजाराहून अधिक अपघात; ३०८० नागरिकांचा मृत्यू
अपघात
अपघात
Published On

मावळ : रस्‍ते अपघातांची मालिका थांबता थांबत नाही. यास अगदी रस्‍त्‍यांची दुरावस्‍था देखील कारणीभूत ठरले आहेत. मात्र गेल्‍या तीन महिन्‍यातील अपघातांच्‍या आकड्याचे वास्‍तव पाहिले तर धक्‍कादायक चित्र समोर येत आहे. राज्यातल्या पाच महामार्गावर सहा हजारांहून अधिक अपघात झाले असून यात तीन हजार ८० जणांना प्राण गमवावे लागले आहेत. (pune-news-accident-news-maharashtra-state-highway-six-thousand-accident-case-last-three-month)

कोविडमुळे देशात लॉकडाउन लागला होता. यामुळे अपघातांचे प्रमाण जरी घटले असले तरी गेल्या तीन महिन्यात मुंबई- पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग, नवी मुंबई ते कोहळापूर, मुंबई ते आग्रा, मुंबई ते सुरत या महामार्गावर जून ते ऑगस्ट या तीन महिन्यात सहा हजार सातशे साठ अपघात झाले आहेत. मात्र बहुतांशी अपघात हे वाहन चालकाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचे निष्पन्न होत आहे.

अतिस्‍पीड ठरला धोक्‍याचा

वाहन चालकला झोप नाही; त्यामुळे वाहनावरील ताबा सुटतो लेन कटिंग. वाहनाला ओव्हरटेक करणे. असा अनेक कारणांनी अपघात झाले आहे. दरम्यान मोठ्या महागड्या गाड्या घेऊन १८० ते दोनशे स्पीडने चालवण्याचा वाहन चालक प्रयत्न करतो. त्यामुळे यातही अपघात होण्याची शक्यता असते. आता नवीन वाहन फारच वजनाने हलके असतात आणि स्पीड जास्त त्यामुळेही वाहनांचा अपघात होण्याची शक्यता आहे.

अपघात
मुलाचे अपहरण, पतीला मारण्याची धमकी देत विवाहितेवर अत्‍याचार

साडेतीन हजाराहून अधिक गंभीर

राज्यातील पाच वेगवेगळ्या महामार्गावर गेल्या तीन महिन्यात झालेल्या अपघांतामध्ये सहा हजारांहून अधिक अपघातांमध्ये तब्बल तीन हजार अंशी प्रवाशांचा मृत्यू झाला. तर तीन हजार ६७९ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com