Maharashtra Politics: अजित पवार युतीमध्ये अयशस्वी; शरद पवार गटाने मविआसह ठरवला फॉर्म्युला

Sharad Pawar MVA Pune Strategy: पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीचं गणित फिस्कटलयं...मात्र त्याचं वेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मविआसोबत युतीची नवी रणनीती आखलीय... ही रणनीती नेमकी काय आहे? पुण्यातील राजकीय समीकरणं नेमकी कशी आहेत?
Pune political leaders in discussion as NCP alliance talks collapse, MVA plans new strategy.
Pune political leaders in discussion as NCP alliance talks collapse, MVA plans new strategy.Saam tv
Published On

भाजपला ऱोखण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे युतीचा प्रस्ताव ठेवला...त्यानंतर दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये बैठकांचं सत्र सुरु झालं...मात्र पुण्यात घड्याळ की तुतारी, नेमकं कोणत्या चिन्हावर लढायचं यावरून ही युती फिस्कटल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. . मात्र असं असलं तरी अजित पवारांची राष्ट्रवादी मात्र युतीसाठी अद्याप आशादायी आहे.

एक युती फिस्कटली तसं शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं तातडीने महाविकास आघाडीच्या बैठकीत उपस्थिती लावली. आणि या बैठकीत मविआच्या जागावाटपाचा फॉर्म्युलाही ठरलाय...

पुण्यात मविआचं ठरलं? (हर्षवर्धन सपकाळ + शरद पवार + उद्धव ठाकरे)

काँग्रेस - 50 जागा

राष्ट्रवादी (SP) - 50 जागा

ठाकरेसेना - 50 जागा

मित्रपक्ष - 15

दरम्यान पुणे महापालिकेसाठी मविआचा फॉर्म्युला ठरला अशी चर्चा असतानाच दुसरीकडे संजय राऊतांनी मात्र पुण्यात राष्ट्रवादीकडून ठोस भूमिका घेतली जात नसल्याचं विधान केलयं... एकूणच पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही हे शरद पवार गटानं जरी स्पष्ट केलं असलं तरी अजित पवार गटाकडून मात्र पुण्यासाठी विजयाची गणित मांडणं सुरूच आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीच्या चर्चांना इथेच ब्रेक लागणार का? की हे तळ्यात मळ्यात ३० तारखेपर्यंत असंच सुरू राहणार हे पाहावं लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com