राष्ट्रवादी विलिनीकरणाला सुरूवात? महापालिका निमित्त, त्यानंतर कायमचं एकत्र?

Ajit Pawar Sharad Pawar Reunion Speculation: पुणे महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींची आघाडी होणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. मात्र या माहापालिकेच्या निमित्तानं दोन्ही पवार कायमचे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झालीय. ही चर्चा का सुरू झाली? विलिनीकरणाची पायाभरणी नेमकी कुठे झाली? कोणी हे सर्व घडवून आणलं?
Senior NCP leaders Sharad Pawar, Ajit Pawar and Supriya Sule during a key political event, as speculation grows over a possible party reunion ahead of Pune civic polls.
Senior NCP leaders Sharad Pawar, Ajit Pawar and Supriya Sule during a key political event, as speculation grows over a possible party reunion ahead of Pune civic polls.Saam Tv
Published On

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असल्याची चर्चा सुरू झाली आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांनी थेट राजीनाम्याची भाषा केली. यावर सुप्रिया सुळेंनी राष्ट्र, राज्य, पक्ष आणि मग कुटुंब असा प्राधान्यक्रम सांगत दोन्ही राष्ट्रवादींच्या आघाडीवर नाराज होण्याचा अधिकार नसल्याचं जगतापांना ठणकावून सांगितलं....त्याचवेळी दोन्ही राष्ट्रवादीत आघाडी होणार हे जवळपास निश्चित झालं होतं. मात्र यानिमित्तानं चर्चा सुरू झाली ती दोन्ही राष्ट्रवादींच्या थेट विलिनीकरणाची

सोमवारपासूनच दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मुंबईत बैठकांचं सत्र सुरू झाल्याचं सुत्रांचं म्हणणंय.

मंगळवारी देवगिरी बंगल्यावर अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह इतरही बड्या नेत्यांची उपस्थिती होती.

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये एकत्र निवडणुका लढवण्याबाबत चर्चा करण्यात आली.

पवारांच्या सिल्व्हर ओक निवसस्थानीही अजितदादा आणि सुप्रिया सुळेंमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

त्यानंतर सुप्रिया सुळेंनी आपल्या खासदारांसह अमित शाहांची भेट घेतली.

त्यानंतर पुण्यातल्या दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीबाबतच्या घडामोडींना वेग आला. पुण्यातल्या नेत्यांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आणि दोन्ही राष्ट्रवादीत आघाडीसाठी खलबतं सुरू झाली.

त्यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचव़ड महापालिकेतल्या आघाडीच्या चर्चांना सुरूवात झाली. आणि या सर्व घडामोडींमुळेच शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी तर शरद पवार थेट एनडीतही येऊ शकतात असा दावाच केलाय. मात्र राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी तो फेटाळून लावलाय.

या विलिनीकरणाबाबत ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊतांनाही प्रश्न पडला होता. त्यामुळे त्यांनी थेट पवारांनाच याबाबत विचारलं असता राऊतांना पवार काय म्हटते ते ऐका...राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवारांनी अनेकदा पवारांना सोबत घेण्याचे प्रयत्न केले होते. मात्र भाजपसोबत कदापी जाणार नसल्याचं पवारांनी वारंवार ठामपणे सांगितलंय. अजितदादा भाजपसोबत सत्तेत आहेत. पुतण्यासोबत विलिनीकरण करणं म्हणजे काकांना थेट भाजपसोबत सत्तेत बसावं लागणार एवढं नक्की.

पुरोगामी नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवारांचा भाजपविरोध सर्वश्रूत असला तरी २०१४ साली त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यानंतर तत्कालीन संयुक्त शिवसेनेला खिंडीत गाठण्यासाठी पवारांनी भाजपला बिनशर्त बाहेरून पाठिंब्याचा प्रस्ताव दिला होता हे विसरून चालणार नाही. त्यामुळेच गेल्या दशकभराचं राजकारण पाहता महाराष्ट्रात काहीही घडू शकतं एवढंच खरं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com