Manchar Bus Stand: मंचर बस स्थानक उद्घाटन सोहळ्याबाबत मोठी अपडेट; उद्घाटन न करताच बसस्थानक होणार सुरु

Manchar Bus Stand: सहकारमंत्री दिलीप वळसेपाटीलांच्या मतदार संघातील मंचर बसस्थानक उद्घाटन आता रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे उद्घाटन न करताच मंचर बस स्थानक सुरु होणार आहे.
Manchar Bus Stand
Manchar Bus StandSaam TV
Published On

रोहिदास गाडगे

Pune News:

पुण्यातील मंचर बस स्थानकाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. उद्घाटन न करताच मंचर बस स्थानक नागरिकांसाठी सुरु होणार आहे. मंचर एसटी आगाराचा उद्घाटन सोहळा ११ नोव्हेंबरला होणारा होता. मात्र मराठा समाजाच्या विरोधानंतर अखेर मंचर बस स्थानक उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आलाय.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Manchar Bus Stand
Pune Crime News: रक्षकच बनले भक्षक..अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; पुण्यातील धक्कादायक प्रकार

एसटी बस स्थानकाची इमारत सात वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. अशात आता उद्घाटन न करताच बस स्थानक जनसेवेसाठी उपलब्ध करावे अशा सूचना सहकारमंत्री दिलीप वळसेपाटलांनी दिल्यात.

राज्यात मराठा आरक्षणाचा तिढा कायम असताना सहकारमंत्री दिलीप वळसेपाटलांच्या मतदार संघात मंचर बस स्थानकाचे उदघाटन वादात सापडलं होतं. ११ नोव्हेंबरला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसेपाटील, चंद्रकांत पाटील, डॉ अमोल कोल्हे निलम गोह्रे यांच्या उपस्थितीत मंचर बस स्थानकाचा उद्घाटन सभारंभ होणार होता.

या उद्घाटनाला सकल मराठा मोर्चाकडून तीव्र विरोध करण्यात आला. "पहिलं आरक्षण मगच उद्घाटन" अशी भूमिका मराठा बांधवांनी घेतली होती. तसेच राज्याच्या प्रमुख नेत्यांना त्यांच्या कार्यक्रमस्थळी काळे झेंडे दाखवत त्यांचा अपमान केला जाईल, असा इशारा मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजळेंनी दिला होता. त्यामुळे सहकारमंत्री दिलीप वळसेपाटीलांच्या मतदार संघातील मंचर बसस्थानक उद्घाटन आता रद्द करण्यात आले आहे. उद्घाटन न करताच आता मंचर बस स्थानक सुरु होणार आहे.

Manchar Bus Stand
Manchar Crime News: मंचरमध्ये ज्वेलरी शॉपवर दरोडा; पोलिसांनी सिनेस्टाइलने ५ जणांना केली अटक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com