Accident News: पुणे– नाशिक महामार्गावर दोन विचित्र अपघात

पुणे– नाशिक महामार्गावर दोन विचित्र अपघात
Accident News
Accident NewsSaam tv

खेड : पुणे– नाशिक महामार्गावर खरपुडी फाट्यावरील उतारावर १७ महिलांना चिरडल्याची घटना ताजी असताना आज त्याच ठिकाणी पुन्हा दोन वाहनांचे वेगवेगळे विचित्र (Accident) अपघात झाले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.

Accident News
Jalna News: अवकाळी पावसाचा फटका; हरभरा, कांदा, गव्हाचे नुकसान

चाकणवरुन नाशिकच्या दिशेने जात असलेल्‍या कंटेनरचे उताराला स्टेरिंग फेल झाले. चालकाच्‍या सदर प्रकार लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत कंटेनर झाडाला धडकला. तर नाशिकवरुन चाकणच्या दिशेने जात असलेल्‍या टेम्पोचा टायर फुटल्याने महामार्गावर पलटी झाला.

महामार्गावर झालेल्‍या या दोन्ही अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. तरी अपघातांची मालिका सुरुच आहे. त्यामुळे महामार्ग प्रशासनाकडुन अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी कुठल्याच उपाययोजना होत नसल्याची भावना स्थानिक नागरिक करत आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com