Pune Crime : मटण, दारू पार्टीसाठी पैसे नव्हते; आखला खतरनाक प्लॅन, एका चुकीने मात्र सापडले पोलिसांच्या ताब्यात

Pune News : परराज्यातून चौघेजण पुण्यात कामासाठी आले. त्यांनी पेंटिंगचे काम करण्यास सुरवात केली. सोबत राहत असताना बाहेरच खायचे. यातच चौघांना चिकन, मटण करण्यासाठी आणि त्यासोबत दारू पिण्यासाठी प्लॅन बनवला
Pune Crime
Pune CrimeSaam tv
Published On

अक्षय बडवे
पुणे
: परराज्यातून कामानिमित्ताने पुण्यात आले होते. काम करताना चौघांना पार्टी करण्याची इच्छा झाली. हॉटेलमध्ये जाऊन दारू आणि मटण पार्टी करण्याचा बेत देखील निश्चित केला. मात्र पार्टीसाठी खिशात पैसे नव्हते. परंतु पार्टी करायचीच यासाठी चौघांनी मिळून प्लॅन आखला आणि एक दुकान फोडले. चोरी केलेल्या पैशातून पार्टी केली. मात्र एका चुकीमुळे पोलिसांच्या ताब्यात सापडले आहेत. 

पुणे शहरात हि धक्कादायक घटना समोर आली आहे. परराज्यातून चौघेजण पुण्यात कामासाठी आले होते. पुण्यात राहून त्यांनी पेंटिंगचे काम करण्यास सुरवात केली. सोबत राहत असताना बाहेरच खायचे. यातच चौघांना चिकन, मटण करण्यासाठी आणि त्यासोबत दारू पिण्यासाठी प्लॅन बनवला. पण खिशात पैसे नसल्याने पार्टी कशी करायची असा प्रश्न त्यांना पडला. अशातच त्यांनी पुण्यातील एक दुकान फोडून तेथील पैसे गायब करायचे ठरवलं. 

Pune Crime
Sangli Crime : सांगली हादरले; दहावीतील मुलीवर अत्याचार, पीडितेने घटनेनंतर संपविले जीवन, चार जण ताब्यात

दुकानाचे शटर तोडून केली चोरी 

चौघांनी आखलेल्या प्लॅननुसार ५ जुलैला पुण्यातील नाना पेठेत एका दुकानाचे शटर उचकटुन आत प्रवेश केला. यानंतर दुकानात ठेवलेले १५ हजार रुपये त्यांनी चोरले. या चोरीच्या पैशातून त्यांनी चिकन, मटण शिजवून आणि दारू पिऊन पार्टी सुद्धा केली. तर दुसऱ्या बाजूला चोरी प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी चोरीचा तपास करण्यास सुरवात केली होती. 

Pune Crime
Panjhara River Flood : पुराच्या पाण्यातून पुलावरून दुचाकी नेण्याचा प्रयत्न अंगाशी; थोडक्यात बचावला दुचाकीस्वार

चौघेजण पोलिसांच्या ताब्यात 

घटनेचा तपास करत असताना पोलिसांनी सीसीटिव्हीच्या माध्यमातून चोरी करणाऱ्या या ४ जणांचा शोध घेतला असता ते बाहेरच्या राज्यातून आल्याचे समजले. त्यानुसार सुजल परदेशी (वय २०), सुभाष राजेश सरोज (वय २१), नितीन सरोज (वय २२) आणि रोहीत सरोज (वय २२) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आरोपींनी मौजमजेसाठी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडुन चोरी केलेली रक्कम जप्त आणि दुकान फोडण्यासाठी वापरलेली हातोडी जप्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com