

Pune Latest News : मी आजारी आहे, मला गाडी चावलता येत नाही, असे म्हणत कॉलेजला जाणाऱ्या तरुणींची मदत मागून त्यांचा विनयभंग करणाऱ्या एका आरोपीला चतुर्श्रुंगी पोलिसांनी अटक केली आहे. अनुप वाणी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.
अनुप मला गाडी चालवता येत नाही म्हणत कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींना मदत करण्यासाठी विनंती करायचा आणि गाडी चालवायला देऊन पाठीमागे बसून मुलीचा विनयभंग करायचा. या संतापजनक घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून सतत अशाप्रकारच्या गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहे. आतापर्यंत या आरोपीने १७ ते १८ तरुणींचा विनयभंग केला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. पाच ते सात लोकांनी त्याच्या विरोधात तक्रार दिलेली आहे. अनुप असे या आरोपीचं नाव असून तो 44 वर्षांचा आहे. तो शनिवार पेठेतील रहिवाशी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. (Tajya Marathi Batmya)
दरम्यान पुणे पोलिसांकडून महिलांच्या सुरक्षिततेसाठी एक हेल्पलाइन जारी करण्यात आला आहे. प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियातून वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुप वरून सुद्धा या हेल्पलाइनचा नंबर प्रसार करण्यात आला होता. गेल्या १० तारखेला ही हेल्पलाइन जारी करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे ११ तारखेला या हेल्पलाइनवरून चतुर्श्रुंगी पोलिसांना ही तक्रार प्राप्त झाली. (Latest Political News)
चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी सांगितले की, आम्ही तांत्रिक तपास करून आरोपीला शनिवार पेठेतून अटक केली आहे. त्याची चौकशी केली असता त्याने असे अनेक प्रकारचे गुन्हे केल्याचे आम्हाला समजलं असेही त्यांनी सांगितले. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.