महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी निलंबित पीएसआय गोपाल बदनेची अटकेनंतरही बदमाशी सुरुच आहे... महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात अत्यंत महत्वाचा पुरावा असलेला बदनेचा मोबाईल शरण येण्याआधीच गायब केल्याचं समोर आलंय.. एवढंच नाही तर मोबाईल कुठं लपवला, यासंदर्भात माहिती देणयासाठी बदने टाळाटाळ करतोय.. त्यामुळं मृत्यूचं गूढ उकलण्याचं मोठं आव्हान पोलिसांपुढं उभं ठाकलंय.. मात्र बदनेच्या मोबाईलमध्ये नेमकं काय दडलंय?
आत्महत्येआधी डॉक्टरचं गोपाल बदनेसोबतचे कॉल्स डिटेल्स
बदनेनं महिला डॉक्टरला दिलेल्या धमकीचे पुरावे
बलात्काराशी संबंधित फोटो किंवा व्हिडीओ
डॉक्टरच्या आत्महत्येआधीचं बदनेचं लोकेशन
बदनेचा मोबाईल गायब असताना पोलिसांसमोरचा पेच वाढलाय.. तर दुसरीकडे महिला डॉक्टरच्या लास्ट सीन आणि स्टेटसचा दाखला देत नातेवाईकांनी गंभीर आरोप केलेत..
तर डॉक्टर महिलेच्या सीडीआरमध्येही बदनेशी संपर्क झाल्याचं उघड झालंय..या सीडीआरमध्ये काय आहे डॉक्टर निर्भयाच्या सीडीआरमध्ये काय
- प्रशांत बनकर आणि गोपाल बदनेसोब डॉक्टर निर्भयाचे कॉल
- मृत्यूच्या काही वेळ आधी डॉक्टर आणि बदने यांच्यात फोनवर संभाषण
- डॉक्टर महिलेचा बदने, बनकरशी व्हॉट्सॲपवर संवाद झाल्याची माहिती
- गोपाल बदनेने मोबाईल फोन पोलिसांच्या ताब्यात दिलेला नाही
महिला डॉक्टरचा छळ आणि तिच्यावर बलात्कार करणाऱ्या बदनेचे काळे कारनामे आता समोर येण्यास सुरुवात झालीय... बदने ड्युटीवर नसतानाही गाड्या अडवून लूट करत असल्याचं समोर आलंय.. मात्र मैत्रीशिवाय कोणतंही रिलेशन नसल्याचं बदनेकडून सांगण्यात येतंय.... त्यामुळेच सायबर पोलिसांनी बदनेचा मोबाईल शोधण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे बदनेचा मोबाईलमध्ये त्याच्याच बदमाशीचे कारनामे सापडणार की संतोष देशमुख हत्या प्रकरणासारखंच बड्या धेंडांची नावं पुढं येऊ नये म्हणून मोबाईलचं गूढ कायम राहणार याचीच उत्सुकता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.