वीजदर कमी करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्याधिकारी कार्यलयासमोर निदर्शने

विजेचे दर कमी करण्यासाठी आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
वीजदर कमी करण्यासाठी जिल्ह्याधिकारी कार्यलयासमोर निदर्शने
वीजदर कमी करण्यासाठी जिल्ह्याधिकारी कार्यलयासमोर निदर्शनेसंजय जाधव
Published On

बुलढाणा - विजेचे दर कमी करण्यासाठी आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने आज तीव्र निदर्शने करीत जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह विभागामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वीज वितरण कंपनीचे व्यवस्थापकीय अध्यक्ष दिनेश वाघमारे यांना निवेदन देण्यात आले. वीजदर कमी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली. वीजदर कमी न झाल्यास मातोश्री आणि मंत्रालयावर महाराष्ट्रातील शेतकरी शेतमजुरांचा आक्रोश अहवाल घेऊन आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. सतीशचन्द्र रोठे यांनी दिला आहे. (Protests in front of Buldhana District Collector's Office to reduce electricity rates)

हे देखील पहा -

यापूर्वी याच संदर्भात 31 जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ई-मेलद्वारे निवेदन देऊन मागणी करण्यात आली होती. मागणीचे गांभीर्य लक्षात घेता त्वरित मुख्यमंत्री कार्यालयाने वीज वितरण कंपनीचे व्यवस्थापकीय अध्यक्ष दिनेश वाघमारे यांना यावर उपाययोजना करण्याचे आदेश केले. परंतु अद्याप पर्यंत विषयाचे गांभीर्य वीज वितरण कंपनीने घेतलेले नसल्यामुळे कंपनीच्या मुजोरशाही धोरणाचा निषेध करीत आझाद हिंद शेतकरी संघटनेने राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री व वीज वितरण कंपनीला निवेदन देत निषेध व्यक्त केला. यावेळी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे बहुसंख्य पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com