शेजाऱ्याचं पाहून तरी पास व्हा; OBC आरक्षणावरून प्रीतम मुंडेंचा टोला

'जे मध्यप्रदेश सरकारला जमलं ते महाराष्ट्र सरकारला का जमत नाही?'
Uddhav Thackeray/Pritam Munde
Uddhav Thackeray/Pritam MundeSaam TV
Published On

बीड : जे मध्य प्रदेश सरकारला जमले ते महाराष्ट्र सरकारला का जमत नाही? मेरीटमध्ये नाही आलं तरी चालेल, मात्र कॉपी करुन शेजाऱ्याचं पाहून पास तर झालं पाहिजे असं म्हणत ओबीसी आरक्षणावरून (OBC Reservation) भाजपा खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. त्या आज बीडमध्ये (Beed) आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, राज्य सरकरचा नाकर्तेपणा आणि इच्छा शक्तीचा अभाव आहे. ट्रिपल टेस्ट मध्य प्रदेश (Madhya Pradesh) सरकारला जमते ती ट्रिपल टेस्ट महाराष्ट्राला का जमत नाही? कारण राज्य सरकारची ओबीसीला आरक्षण देण्याची इच्छा नाही. इच्छाशक्ती असेल तर मार्ग निघतो. जी इच्छाशक्ती शिवराज सिंह चौहान यांनी दाखवली, ती महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने दाखवावी. अशी अपेक्षा प्रितम मुंडें यांनी व्यक्त केली आहे.

हे देखील पाहा -

OBC आरक्षणाबाबत राज्य सरकारवर का होतेय टीका ?

मध्य प्रदेश सरकारला सुप्रीम कोर्टानं दिलासा देत ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. पण महाराष्ट्रात मात्र अद्याप आरक्षणाचा पेच कायम आहे. तर या प्रकरणी राज्य सरकारने मध्य प्रदेश सरकारप्रमाणे प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे राज्यातील ओबींसींचे आरक्षण धोक्यात आलं असल्याची टीका विरोधक करत आहेत. तसंच येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घ्याव्या लागतील की काय अशी शंका विरोधक उपस्थित करत आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com