crime News
crime NewsSaam tv

Chandrapur Prisoner Assaulted Policeman: धक्कादायक! राज्यात कायदा सुव्यवस्था धाब्यावर; चक्क कैद्याकडून पोलिसाला झाडूने मारहाण

Chandrapur Police: या घटनेमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Chandrapur News: चंद्रपूरमध्ये (Chandrapur) एका कैद्याने पोलिसालाच (Chandrapur Police) झाडूने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रपूरच्या शासकीय रुग्णालयात (Chandrapur Government Hospital) या कैद्याला पोलिस उपचारासाठी घेऊन गेले होते त्याचवेळी हा प्रकर घडला. या कैद्याला पोलिसाचा राग आल्यामुळे त्याने रुग्णालयातील झाडू उचलून पोलिसाला मारहाण केली. या घटनेमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसाला मारहाण केलेल्या कैद्याचे मानसिक संतुलन बिघडले आहे. हा कैदी चंद्रपूर जिल्हा कारागृहात गेल्या अनेक महिन्यांपासून शिक्षा भोगत आहे. मंगळवारी या कैद्याची प्रकृती बिघडल्यामुळे त्याला पोलिसांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. याचवेळी अचानक त्याला पोलिसाचा राग आला. त्यामुळे त्याने संतप्त होत रुग्णालयातील झाडू उचलून पोलिसाला मारहाण करण्यास सुरुवात केली. ही घटना रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मोबाईलमध्ये कैद केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.

दरम्यान, सांगली जिल्हा कारागृहामध्ये एका कैद्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सांगली शहरातल्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये कैद्याला सोमवारी लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. कारागृहामधल्या सहा कैद्यांनी या कैद्याला मारहाण केली या मारहाणीत सागर उर्फ कृष्णा नरोटे हा कैदी जखमी झाला. सागला मारहाण करणाऱ्या सहा कैद्यांविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारागृहातील सहा कैद्यांनी मिळून कैदी सागर नरोटे याला मारहाण केली. कारागृहातल्या बराक क्रमांक तीनजवळ हा प्रकार घडला. वैयक्तिक कारणावरुन सहा कैद्यांनी मिळून सागर नरोटे या कैद्याला ही मारहाण केली आहे. याप्रकरणी रोहित उर्फ बाला गाडे, योगेश शिंदे, करण पाटील, धनराज राऊत, विजय उर्फ यशवंत सोनावले आणि दत्तात्रय खांडेकर या सहा कैद्यांच्या विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com