औरंगाबादेत हेल्मेटसक्तीची पुन्हा एकदा कडक अंमलबजावणी

या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व शासकीय, निममशासकीय कार्यालये, शैक्षणिक व इतर संस्थांनाही सहभागी करून घ्यावे आणि त्यानंतर कारवाई अशा सूचना करण्यात आल्यात.
File Photo
File Photo
Published On

औरंगाबाद - शहरात हेल्मेटसक्तीची पुन्हा एकदा कडक अंमलबजावणी करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता शासकीय कार्यालयांत विनाहेल्मेटधारक कर्मचारी, अधिकारी व नागरिकांना प्रवेश मिळणार नाही. असे आदेश परिवहन आयुक्तांनी नुकतेच काढले आहेत. यावर आता औरंगाबाद (Aurangabad) शहरात अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. आरटीओ (RTO) आणि पोलिसांतर्फे हेल्मेटबद्दल (Helmet) जनजागृती करावी, त्यानंतर कारवाई करावी असे आदेश देण्यात आले आहेत.

हे देखील पहा -

आता शासकीय कार्यालयात येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी किंवा नागरिक अशा प्रत्येक दुचाकी चालकाला हेल्मेटशिवाय प्रवेश देऊ नये, हेल्मेट नसल्यास कारवाई करावी आणि जिल्हा प्रशासनातर्फे हेल्मेटचा वापर वाढण्यासाठी प्रबोधन सुरू करावे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व शासकीय, निममशासकीय कार्यालये, शैक्षणिक व इतर संस्थांनाही सहभागी करून घ्यावे आणि त्यानंतर कारवाई अशा सूचना करण्यात आल्यात.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com