'वंचित बहुजन आघाडी बरखास्त करा'; आठवलेंचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला

प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करावी असा सल्ला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.
Prakash Ambedkar/ Ramdas Athavale
Prakash Ambedkar/ Ramdas AthavaleSaam TV
Published On

लातुर : दलित नेत्यांचं ऐक्य होऊन सगळेच नेते एकाच ठिकाणी यावेत यासाठी तुकड्या-तुकड्यांमध्ये राहून निवडणुका लढविण्यापेक्षा, सर्वांनी एकत्र येऊन समाजाला सत्तेच्या ओघात आणावे. यासाठी प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) वंचित बहुजन आघाडी बरखास्त करावी. असा सल्ला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी दिला आहे. ते लातुरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

त्याच बरोबर राज ठाकरेंनी (Raj Thackeray) अश्या धमक्या देऊ नये या देशात सर्वांना सामान हक्क असल्यामुळे कोणी कोणाच्या मशिदीवरचा भोंगा काढू नये, तुम्हाला वाटत असल्यास तुम्हीही मंदिरावर भोंगा लावा. मात्र, भोंगे काढा हे मत चुकीचे असून राज ठाकरेंच्या या मताला रिपाईचा विरोध असल्याचं देखील रामदास आठवले यावेळी म्हणाले.

Prakash Ambedkar/ Ramdas Athavale
Breaking: गुणरत्न सदावर्ते सातारा पोलिसांच्या ताब्यात

शरद पवार (Sharad Pawar) छत्रपती शिवरायांना मानणारे नेते आहेत. तसंच शिवरायांचा वारसा पुढं नेण्याचं काम शरद पवार करत आहेत. फुले, शाहू, आंबेडकर विचारांशी ते एकरूप असल्याच सांगत रामदास आठवले यांनी राज ठाकरेंचा मुद्दा खोडला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com