Prakash Ambedkar: पंधरा दिवसात राजकीय भूकंप होणार? प्रकाश आंबेडकर यांचे शरद पवारांवर आरोप

Prakash Ambedkar Predicts Political Development: येत्या १५ दिवसांत एक मोठा राजकीय बदल होणार असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे, त्यापूर्वीच आंबेडकरांनी हे विधान केले आहे, त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
Prakash Ambedkar hints at a political earthquake before INDIA bloc meeting in Delhi
Prakash Ambedkar hints at a political earthquake before INDIA bloc meeting in Delhi
Published On
Summary
  • इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत होणार आहे.

  • वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक दावा करत मोठी राजकीय घडामोड होणार असल्याचे सांगितले.

  • येत्या १५ दिवसांत देशातील राजकारणात मोठा बदल होण्याचा इशारा.

  • आघाडीतील पुढील रणनीतीवर आणि एकजुटीवर या दाव्याचा परिणाम होण्याची शक्यता.

कुछ बडा होने वाला है, अशी चर्चा सुरु असतानाच प्रकाश आंबेडकरांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. त्यांनी नव्या राजकीय भूकंपाचे संकेत दिलेत. मात्र हा नवा राजकीय भूकंप नेमका कोणता? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Prakash Ambedkar hints at a political earthquake before INDIA bloc meeting in Delhi
Maharashtra Politics: शरद पवारांना मोठा झटका, बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. त्यातच येत्या 15 दिवसात देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी घडमोड घडणार असल्याचा खळबळजनक दावा वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी केलाय. याआधीही प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांवर असेच वेगवेगळे आरोप केले होते.

Prakash Ambedkar hints at a political earthquake before INDIA bloc meeting in Delhi
Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा हादरा, राज्यातील बडा नेता भाजपच्या वाटेवर

आंबेडकर यांचा पवारांवर आरोप

मराठा आरक्षणासंदर्भात पवारांवर आरोप

शरद पवार ओबीसी नेते नसल्याचा आरोप

शरद पवार भाजपचे हस्तक असल्याचा दावा

दरम्यान या आरोपांनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रकाश आंबेडकरावर जोरदार हल्लाबोल केलाय. दरम्यान कुछ बडा होने वाला है, अशी चर्चा सुरु असताना प्रकाश आंबेडकारांनी सूचक वक्तव्य केलयं. त्यामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात भूकंप घडवणारी ही घटना म्हणजे इंडिया आघाडीत फूट आहे की नव्या राजकीय समीकरणांची नांदी याकडे देशाचं लक्ष लागलयं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com