राज्याच्या राजकारणात नवी युती होणार?ठाकरेंनंतर आता आंबेडकर एकत्र येणार?

Anandraj Ambedkar Signals Alliance With Prakash: ठाकरे बंधूनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आता आंबेडकर बंधू एकत्र येण्याची शक्यता आहे.. मात्र आंबेडकर बंधूंच्या युतीचे संकेत कुणी दिले आहेत आणि आंबेडकरांची युती झाली तर त्याचा फटका कुणाला बसणार?
Anandraj Ambedkar hints at reuniting with Prakash Ambedkar, sparking major political discussions in Maharashtra
Anandraj Ambedkar hints at reuniting with Prakash Ambedkar, sparking major political discussions in MaharashtraSaam Tv
Published On

राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधूनंतर आता आंबेडकर बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरु झालीय.. आणि त्याला कारण ठरलंय.... प्रकाश आंबेडकरांचे भाऊ आनंदराज आंबेडकरांनी एकत्र येण्यासाठी घातलेली साद.... राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंप्रमाणेच आम्ही दोघं भाऊ एकत्र येऊ, असं वक्तव्य आनंदराज आंबेडकरांनी केलंय. आणि त्यामुळे वंचितसह रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलाय..

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची रणधुमाळी सुरु झालीय... त्यातच नांदेडसह अनेक जिल्ह्यात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आलीय..दुसरीकडे आनंदराज आंबेडकरांची रिपब्लिकन सेना शिंदेसेनेसोबत आहे....मात्र आता आनंदराज आंबेडकरांनी ठाकरेंप्रमाणेच आंबेडकर बंधू एकत्र येण्याचे संकेत दिलेत... मात्र दोन्ही भाऊ एकत्र आल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतात?

राज्यात 13-15 टक्के दलित मतदार

आंबेडकर बंधू एकत्र आल्यास आंबेडकरी चळवळीला ताकद मिळणार

राज्यात 10-15 विधानसभा आणि 4 लोकसभा जागांवर प्रभाव वाढणार

नागपूर, अमरावती, अकोला, नांदेड, संभाजीनगर, सोलापूर आणि मुंबईत वर्चस्व वाढणार

दलित मतं दुरावल्यास मविआला फटका बसण्याची शक्यता

खरंतर याआधीच रामदास आठवलेंनीही सर्वच रिपब्लिकन नेत्यांना एकत्र यावं आणि प्रकाश आंबेडकरांनी नेतृत्व करावं, असं आवाहन केलं होतं.. आता आनंदराज आंबेडकरांनी भावाला साद घातलीय.. त्यामुळे प्रकाश आंबेडकर ठाकरेंप्रमाणे भावाच्या हाकेला प्रतिसाद देणार का? आणि राज्यात पुन्हा रिपब्लिनक एकजूट दिसणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com