Nashik News: कामगार उपायुक्ताच्या कार्यालयासमोर कामगाराचा आत्मदहनाचा प्रयत्न

Prahar Sanghatana Worker Self-Immolation: प्रहार कामगार संघटनेचे कार्यकर्ते प्रमोद सोनकांबळे यांनी कामगार उपायुक्त कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय. नेमकं काय आहे कारण ते जाणून घेऊ.
Prahar  Sanghatana Worker Self-Immolation
Prahar Sanghatana Worker Self-ImmolationSaamtv
Published On

तरबेज शेख, साम प्रतिनिधी

शासनाकडे बिल थकल्यानं सांगलीतील कंत्राटदाराने आत्महत्या केल्यीची घटना ताजी असताना नाशिकमध्ये धक्कदायक घटना घडलीय. काम मिळत नसल्यानं प्रहार कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यानं आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडल्याचं समोर आले आहे. नाशिक रोड मालधक्का येथे प्रहार कामगार संघटनेच्या कामगारांवर राजकारणामुळे उपासमारीची वेळ आलीय.

तत्कालीन मंत्री बच्चू कडू यांचे निर्देश असतानाही या संघटनेला काम मिळू दिले जात नसल्याने, प्रहार कामगार संघटनेचे कार्यकर्ते प्रमोद सोनकांबळे यांनी सातपूर कामगार उपायुक्तांच्या कार्यालयासमोरच स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु सातपूर पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून सोनकांबळे यांना ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टाळला.

सदर आत्मदहन करण्याची वेळ ही कामगार उपायुक्त, विकास माळी, सह कामगार उपायुक्त चंद्रकांत बिरार, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे रामबाबा पठारे, भारत निकम यांच्यामुळे आली असल्याने तेच जबाबदार राहतील, अशी प्रतिक्रिया प्रसार माध्यमांना सोनकांबळे यांनी दिली. दरम्यान आम्ही कोणाचाही अडवणूक केलेली नाही. असे पठारे यांनी म्हटले आहे.

प्रहार कामगार संघटना संस्थापक बच्चू कडू कामगार मंत्री असताना प्रहार कामगार संघटना व रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे रामबाबा पठारे यांची मंत्रालयात बैठक झाली. कामगार नेते नरेंद्र पाटील व कामगार युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते. रामबाबा पठारे यांनी प्रहार संघटनेला २ बॉक्सचे काम व ६० नोंदणी फॉर्म देण्याचे मान्य केले होते. मात्र, मंत्र्यांचे आदेशपत्र मिळून पाच वर्षे होऊनही प्रहार संघटनेच्या सदस्यांना कामगार उपायुक्तांनी न्याय दिला नाही. उपायुक्तांनी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन संघटनेची बाजू मांडून उडवा-उडवीचे उत्तरे दिली. यामुळे प्रहार संघटनेच्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

वेळोवेळी निवेदन देऊन, आंदोलन करूनही आम्हाला खोटी आश्वासन देण्यात आली. सदर कामाचे नियोजन कामगार उपायुक्तांनी करून दिले नाही, यामुळेच आज २४ जुलैला सातपूर येथील कामगार उपायुक्त कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, असं सोनकांबळे म्हणालेत.

या संपूर्ण घटनेस विकास माळी, सह कामगार उपायुक्त चंद्रकांत बिरार, रामबाबा पठारे, भारत निकम, अनिल आहिरे, राजु मोकळ, दिपक वाघ, प्रभाकर रोकडे, महेंद्र आहिरे, सुभाष आहिरे, सम्राट गायकवाड, लखन गवळी, रवि जगताप हे जबाबदार आहेत, असे प्रहार संघटनेचे प्रमोद सोनकांबळे यांनी सांगितले .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com