Girish Mahajan News: गिरिश महाजन हरवले आहेत, शोधणाऱ्यास ११०० रुपयांचं बक्षीस, नायगाव शहरात झळकले पोस्टर; कारण...

Maharashtra Politics: या पोस्टर्सची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
Girish Mahajan
Girish Mahajan Saam TV

संजय सुर्यवंशी, प्रतिनिधी...

Nanded News: राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शुक्रवारी मतदान झाले होते. त्याचे निकाल शनिवारी समोर आले आहेत. या निकालावरुन राज्याचे राजकारण (Maharashtra Politics) चांगलेच तापले असतानाच भाजप नेते गिरीश महाजन एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत.

कारण नांदेड जिल्ह्यातील नायगाव शहरात चक्क गिरिश महाजन हरवले असल्याचे पोस्टर झळकावण्यात आले आहेत. तसेच त्यांना शोधून देणाऱ्यास ११०० रुपयांचे बक्षिसही देण्यात असल्याचे जाहीर केले आहे. या पोस्टर्सची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, चला जाणून घेवूया.. (Latest Marathi News)

Girish Mahajan
Nagpur Crime News: नागपुरात खळबळ! झोपेत असताना शॉर्ट सर्किटमुळे घराला लागली आग, दोघांचा गुदमरुन दुर्दैवी मृत्यू

याबाबत अधिक माहिती अशी की, भाजपचे (BJP) संकटमोचक नेते म्हणून गिरीश महाजन (Girish Mahajan) ओळखले जातात. गिरीश महाजन यांच्याकडे नांदेड, लातूर, आणि धुळे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र सत्ता स्थापन झाल्यापासून पालकमंत्री महाजन यांनी नांदेडला वेळ देत नसल्याचा आरोप युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

इतकेच नव्हेतर शहरात युवक काँग्रेसने (Congress) नांदेडचे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या विरोधात आंदोलनही सुरू केले आहे. पालकमंत्री हरवले अश्या आशयाचे पोस्टर नायगाव शहरात लावले आहेत. तसेच त्यांना शोधून देणाऱ्यास ११०० रुपयांचे बक्षिसही देण्यात असल्याचे जाहीर केले आहे.

गुलाबराव पाटील यांचेही झळकले होते पोस्टर...

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बुललढाण्यामध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील हरवले आहेत. अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले होते. तसेच पाटील यांना शोधून देणाऱ्याला 51 रुपयांचं बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं हे पोस्टर लावण्यात आले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com