राज्यात पावसाने पाठ फिरवली आहे. पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजा पावसाकडे आतुरतेने पाहत आहे. पाऊस लांबल्याने पिके करपू लागली आहेत. तसेच पाऊस लांबल्याने त्याचा परिणाम फळांच्या उत्पादनावरही होऊ लागला आहे. यामुळे बाजारात डाळिंबाचा पुरवठा कमी आणि मागणी वाढल्याने डाळिंबाच्या भावाने उसळी घेतली आहे. (Latest Marathi News)
डाळिंबाला मागणी वाढल्याने डाळिंबाच्या भावाने उसळी घेतली आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत भावात प्रति किलो 50 रुपयांनी वाढ झाली आहे. चांगल्या प्रतिच्या डाळिंबाला प्रति किलो 120 रुपयांचा भाव मिळाला आहे. तसेच कमी प्रतिच्या डाळिंबाला 70 रुपयांचा दर मिळाला.
सोलापुरातील पंढरपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब बाजारात आज सुमारे पाच हजार क्रेटची आवक झाली आहे. डाळिंबाची आवक कमी झाल्याने दरात मोठी वाढ झाली आहे.
सोलापूर जिल्हा हे डाळिंबाचे आगार मानलं जातं. याच सोलापुरात दुष्काळजन्य परिस्थितीमुळे डाळिंबाच्या बागांवर मोठे संकंट ओढावलं आहे. यामुळे डाळिंबाच्या उत्पनात घट झाल्याचे दिसून आलं आहे.
दरम्यान, श्रावण मास सुरु असल्याने डाळिबांसह इतर फळांचीही मागणी वाढली आहे. त्यामुळे डाळिंबाच्या दरात चांगली वाढ झाली आहे. त्यात बाजारात डाळिंबाला प्रति किलो 100 रुपयांच्या पुढे भाव मिळाला आहे. भाव वाढल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, राज्यात पावसाने ओढ दिली आहे. त्यात पावसाळा सुरू झाल्यानंतर दोन महिन्यांनी जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध होतो. मात्र, ऑगस्ट महिना संपत येत आहे. मात्र, तरीही या भागात जनावरांच्या हिरव्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे हिरव्या चाऱ्याला मागणी वाढल्याने चाऱ्याचे भाव भडकल्याचे दिसून आले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.