Political News : मनसेच्या 'या' नेत्याला मुंब्र्यात येण्यास मज्जाव; कायदा सुव्यवस्थेचे दिले कारण

मुंब्रा येथील अनधिकृत दर्गा, मजार, मशिदचा मुद्दा अविनाश जाधव यांनी उपस्थित केला होता.
Mumbra Police Station
Mumbra Police StationSaam Tv

Avinash Jadhav : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांना पुन्हा मुंब्रा येथे नो एन्ट्री करण्यात आली आहे. मुंब्रा येथील अनधिकृत दर्गा, मजार, मशिदचा मुद्दा अविनाश जाधव यांनी उपस्थित केला होता. यावरून कोणताही अनर्थ घडूनये यासाठी अविनाश जाधव यांना बंदी घालण्यात आली आहे. (Political News)

15 दिवसांचे दिले होते अल्टिमेट

मुंब्रा येथे काही ठिकाणी अनधिकृत रित्या दर्गा, मजार आणि मशिद उभारण्यात आल्या आहेत. त्यावर लवकर कारवाई व्हावी,अशी मागणी अविनाश जाधव यांनी केली होती. पुढे त्यांना १५ दिवसांचा अल्टिमेट देत कारवाई न झाल्यास कठोर पाऊल उचलण्याचा इशारा दिला.

Mumbra Police Station
Hospital Canteen Viral Video : पायात बूट घालून धुतले बटाटे; रुग्णालयाच्या कॅन्टीनमधील किळसवाना व्हिडिओ व्हायरल

यावेळी अविनाश जाधव म्हणाले होते की, " १५ दिवसांमध्ये योग्य ती कारवाई न झाल्यास दर्गा मजार मशिद शेजारी हनुमान मंदिर उभारण्यात येतील. यामुळे दोन्ही गटातील तणाव वाढून वाद चिघळण्याची शक्यता होती. त्यामुळे 9 तारखेपर्यंत अविनाश जाधव यांना मुंब्रा तेथे बंदी घालण्यात आली होती.

11 एप्रिल रोजी अविनाश जाधव यांची मुंब्रा येथे नेते पदी निवड झाल्यामुळे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असल्याने त्या दरम्यान शांततेचा भंग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Mumbra Police Station
Viral Video : धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न, अवघ्या एका सेकंदाने वाचला प्रवाशाचा जीव; थरकाप उडवणारी घटना

या दरम्यान अविनाश जाधव यांच्याकडून मुंब्रा येथे प्रक्षोभक भाषण केलं जाण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. यासाठी पोलिसांनी अविनाश जाधव यांच्या मुंब्रा नो एंट्रीमध्ये वाढ केली आहे.

कळवा मुंब्रा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विलास शिंदे यांनी मुंब्रा येथे कलम 144 अन्वये जमावबंदी लागू करून 23 एप्रिल 2023 पर्यंत अविनाश जाधव यांना मुंब्रा येथे नो एन्ट्री केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com