रामू ढाकणे
राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू आहे. अशात मतदारसंघातील सभा, बैठकांसह कार्यकर्ते सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. अशा पद्धतीने व्यक्त होत असताना कायदा आणि सुव्यवस्था राखावी यासाठी सोशल मीडियाच्या पोस्टवर आता पोलिसांचे 24 तास लक्ष राहणार आहे.
पाच पोलिसांच्या टीमच्या माध्यमातून निवडणुकीच्या काळात सोशल मीडिया पेट्रोलिंग होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अहोरात्र व्यक्त होणाऱ्यांवर पोलिसांची आता करडी नजर असणार आहे.
मेसेज व्हिडिओ फोटो कोणालाही समजणार नाहीत हा गैरसमज आता मनातून काढून टाकावा. कारण अशा प्रत्येक आक्षेपार्ह पोस्टवर पोलिसांच्या सोशल मीडिया सेल करून दिवस रात्र लक्ष असणार आहे. यासाठी 5 पथकांच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवून मीडिया पेट्रोलिंग होणार आहे.
यामुळे सर्वच प्लॅटफॉर्मवर सायबर पोलीस आता बारीक लक्ष ठेवून असल्याने एकाचवेळी असंख्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा वापर होत आहे. अनेक जण आक्षेपार्य पोस्ट व्हिडिओ मेसेज प्रसारित करतात शिवाय काही वादग्रस्त पोस्टमुळे सामाजिक शांतता आणि सुव्यवस्था बिघडू शकते.
यासाठी शहर पोलिसांनी खास सोशल मीडिया नियंत्रण कक्ष सुरू करून यामध्ये 1 अधिकारी आणि 10 कर्मचारी नेमले आहेत. दरम्यान काही अक्षेपार्ह फोटो आणि मजकूर व्हायरल करणाऱ्या विरुद्ध कलम 502 नुसार गुन्हा दाखल होतो. आणि त्याला एक ते दोन लाखापर्यंत दंड होऊन तीन वर्षाची शिक्षा देखील होऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.