अकोला - पालकमंत्री बच्चू कडू Bacchu Kadu यांनी वेषांतर करून जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रतिबंधित गुटखा Gutkha विक्रीचा भांडाफोड केला होता. यानंतर पोलिस Police अधीक्षक यांच्या विशेष पथकाकडून प्रतिबंधित गुटखा विक्री आणि साठवणूक करणाऱ्यावर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. मात्र, अन्न व औषध प्रशासन FDA विभागाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. Police in Akola on Action mode After Bacchu Kadu Sting Operation
विशेष म्हणजे, पालकमंत्री कडू यांनी यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. त्याबाबत अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी यासंदर्भात आमच्या विभागाचा अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट नमूद केले आहे.
पालकमंत्री बच्चू कडू यांनी २१ जून रोजी वेषांतर करून जिल्ह्यातील अकोला, पातूर, बार्शीटाकळी गुटखा खरेदी केला. तसेच त्यांनी रेशन दुकानातून विनाकार्ड राशन मिळविण्याचा प्रयत्न केला. प्रतिबंधित गुटखा त्यांना सहज मिळाला. त्यासोबतच गुटखा विक्रीसंदर्भात त्यांनी पोलिस आणि अन्न औषध प्रशासन विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांवर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.
दरम्यान, यानंतर पोलिस विभागाकडून कारवाई करण्यास सुरु झाली. पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने प्रतिबंधित गुटख्यावर तेव्हापासून सतत कारवाई सुरू केली आहे. परंतु, अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाई अद्यापही कारवाई झालेली नाही. त्यामुळे या विभागाचे अधिकारी कारवाईसाठी कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे. Police in Akola on Action mode After Bacchu Kadu Sting Operation
अन्न व औषध प्रशासन विभागाची पालकमंत्री बच्चू कडू यांनी पोलखोल केल्यानंतर या विभागाचे मंत्री राजेंद्र शिंगणे यावर प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री बच्चू कडू यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशननंतर अकोला विभागातील अधिकारी यांचे गुटखा माफियांसोबत साटेलोटे असल्याचे चौकशीत सिद्ध झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे.
Edited By - Amit Golwalkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.