Ulhasnagar News: पोलिसाच्या मुलाचे सिनेस्टाईल अपहरण, मारहाण करत खंडणीही उकळली; उल्हासनगरमधील धक्कादायक घटना

Ulhasnagar News Today: चाकूचा धाक दाखवून एका पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलाचे आरोपींनी सिनेस्टाईल अपहरण केले. त्यानंतर मारहाण करत त्याच्याकडून खंडणी देखील उकळली.
police constable son Cinestyle kidnapping beating and extortion Ulhasnagar Shocking Incident
police constable son Cinestyle kidnapping beating and extortion Ulhasnagar Shocking IncidentSaam TV

Ulhasnagar News Today Live

चाकूचा धाक दाखवून एका पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलाचे आरोपींनी सिनेस्टाईल अपहरण केले. त्यानंतर मारहाण करत त्याच्याकडून खंडणी देखील उकळली. ही धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

police constable son Cinestyle kidnapping beating and extortion Ulhasnagar Shocking Incident
Satara Earthquake: मोठी बातमी! साताऱ्यात भूकंपाचे सौम्य धक्के; मध्यरात्री नागरिकांची धावपळ, परिसरात घबराट

अजय बागुल, असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. त्याचे तीन साथीदार फरार झाले असून पोलीस (Police) त्यांचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर म्हारळगाव मध्ये राहणारा दुर्गेश कैलाश वारे याला गुरूवारी रात्री देवा खेडकर नावाच्या तरुणाने चाकूचा धाक दाखवून जबरीने कारमध्ये बसवलं.

त्यानंतर कार सुसाट वेगाने कांबा गावाच्या जंगलाच्या दिशेने गेली. तिथे आरोपीचे तीन साथीदार आले. त्यांनी दुर्गेश याला जबर मारहाण करत त्याच्याकडून ३० हजार रुपयांची खंडणी वसूल केली. आरोपींच्या तावडीतून सुटल्यानंतर दुर्गेशने पहाटे तीन वाजता मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला. दरम्यान, पोलिसांनी कॅम्प नं-३,चोपडा कोर्ट परिसरात राहणाऱ्या अजय बागुल याला अटक केली. आरोपीचे इतर तीन साथीदार अद्यापही फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे. दुर्गेश कैलाश वारे हा रेल्वे पोलीस विभागात असणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलचा मुलगा असल्याचे उघड झाले आहे.

Edited by - Satish Daud

police constable son Cinestyle kidnapping beating and extortion Ulhasnagar Shocking Incident
Maharashtra Politics: कोर्टाने लेखी आदेश दिले, तरच सुधारित वेळापत्रक सादर करणार, राहुल नार्वेकरांची भूमिका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com