Pimpri Chinchwad
Pimpri ChinchwadSaam tv

Pimpri Chinchwad : ३०० सीसीटीव्ही कॅमेरांचे फुटेजमधून सत्य आले बाहेर; दोघे सराईत ताब्यात, साडेसतरा लाखाच्या दुचाकी केल्या जप्त

Pimpri chinchwad News : पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेण्यासाठी जवळपास ३०० सीसीटीव्ही कॅमऱ्यांचे फुटेज तपासून निगडी पोलिसांनी या दोन्ही अट्टल दुचाकी वाहन चोरणाऱ्या चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत
Published on

पिंपरी चिंचवड : वेगवेगळ्या शहरांमधून दुचाकी चोरी केल्या जात होत्या. पिंपरी चिंचवड शहरातील निगडी पोलिसांनी दुचाकी वाहन चोरणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल १७ लाख ५० हजार किमतीच्या ३० दुचाकी वाहन जप्त केल्या आहेत.

राम ऊर्फ कविराज ज्ञानोबा केंद्रे आणि अविनाश तुकाराम होळंबे अशी दुचाकी चोरणाऱ्या अट्टल चोरट्यांची नावे आहेत. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेण्यासाठी जवळपास ३०० सीसीटीव्ही कॅमऱ्यांचे फुटेज तपासून निगडी (Police) पोलिसांनी या दोन्ही अट्टल दुचाकी वाहन चोरणाऱ्या चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. यानंतर त्यांच्याकडून चोरीच्या ३० दुचाकी जप्त केल्या आहेत. 

Pimpri Chinchwad
Pune News : मुळा नदीत मृत माशांचा खच; रसायन मिश्रित पाणी नदीत सोडल्याचा परिणाम

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन्ही चोरट्यांनी मिळुन (Pimpri chinchwad) पिंपरी चिंचवड, पुणे, बीड, लातूर, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहन चोरी केल्याचे गुन्हे केले आहेत. निगडी पोलिसांनी या दोन्ही वाहन चोरट्यांकडून दुचाकी वाहन चोरीचे २७ गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यांच्याकडून जवळपास १७ लाख ५० हजार इतक्या किंमतीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. पोलिसांकडून आणखी तपास सुरु आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com