Pimpri Chinchwad : महापारेषणचा बिघाड; महावितरणच्या ५२ हजार वीजग्राहकांना फटका, पिंपरी परिसरात रात्रीपासून अंधार

Pimpri Chinchwad News : दुरुस्तीचे काम झाल्यानंतर वीजपुरवठा सुरु करताना दुपारी दोन वाजेच्या सुमारास २२० केव्ही इन्फोसिस ते २२० केव्ही पेगासस अतिउच्चदाब भूमिगत वीज वाहिनीत बिघाड झाला
Pimpri Chinchwad
Pimpri ChinchwadSaam tv
Published On

पुणे : महापारेषण कंपनीच्या २२० केव्ही इन्फोसिस ते २२० केव्ही पेगासस अतिउच्चदाब भूमिगत वीज वाहिनीत बिघाड झाला आहे. यामुळे महावितरणच्या गणेशखिंड व पुणे ग्रामीण मंडळातील सुमारे ५२ हजारांहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा रविवारी दुपारपासून ठप्प झाला होता. परंतु, महावितरणने युद्धपातळीवर काम करत आज पहाटेपर्यंत सर्व लघुदाब ग्राहकांचा वीजपुरवठा पर्यायी व टप्पाटप्प्याने सुरळीत केल्याने नागरी भागांना दिलासा मिळाला आहे. तर काही उच्चदाब ग्राहकांना सुरु होण्यास अवधी लागणार आहे.

महापारेषण कंपनीमार्फत देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी (६ जुलै) सकाळी ११ ते दुपारी १ असा वीजपुरवठा बंद केला होता. दरम्यान दुरुस्तीचे काम झाल्यानंतर वीजपुरवठा सुरु करताना दुपारी दोन वाजेच्या सुमारास २२० केव्ही इन्फोसिस ते २२० केव्ही पेगासस अतिउच्चदाब भूमिगत वीज वाहिनीत बिघाड झाला. परिणामी महावितरणच्या ग्राहकांना वीजपुरवठा करणाऱ्या २२ केव्हीच्या २५ वाहिन्या, अतिउच्चदाबचे इन्फोसिस व नेक्सट्रा हे दोन ग्राहक अशा ९१ उच्चदाब आणि ५२ हजारांहून अधिक लघुदाब ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. यामध्ये पिंपरी विभागातील २० हजार व मुळशी विभागातील ३२ हजार घरगुती व वाणिज्यिक लघुदाब ग्राहकांचा समावेश आहे.

Pimpri Chinchwad
Pandharpur Crime : पंढरपूर हादरले; पत्नीला कलाकेंद्रात नाचायला पाठवलं, दिराने केली भावजयीची हत्या

या भागांत वीज पुरवठा खंडित 
वीज वाहिनीत बिघाड झाल्याने मुळशी विभागातील एक्सरबिया सोसायटी, कोलते पाटील टाऊनशिप, मारुंजी, माण, जांबे, मेरे, दत्तवाडी या भागातील सुमारे ३२ हजारांवर ग्राहक रविवार दुपारपासून बाधित झाले होते. तर पिंपरी विभागील हिंजवडी एमआयडीसी, आयटी पार्क, रायसोनी पार्कचा भाग, डॉहलर कंपनी तसेच विप्रो सर्कलच्या परिसराला याचा फटका बसला. आता काही औद्योगिक ग्राहक वगळता सर्व नागरीप्रवण भागांचा वीजपुरवठी पर्यायी मार्गाने सुरु केला आहे.

Pimpri Chinchwad
Jalna : बंदुकीचा धाक दाखवून व्यापाऱ्याचे अपहरण; ५० लाख रुपयांची खंडणी मागणारे दोघे अटकेत, जालना जिल्ह्यात खळबळ

पहाटेपर्यंत लघुदाब वीजपुरवठा सुरळीत 

दरम्यान रविवारी रात्री १० वाजता पहिल्या टप्प्यात २ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरु झाला. तर सोमवारी पहाटे ४ पर्यंत सर्व लघुदाब ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत केला गेला. यानंतर कोलते पाटील टाऊनशिप सुरु झाली. या उपकेंद्रातून काही औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा सुरु करण्यात यश आले. मात्र ८५ उच्चदाब व २ अतिउच्चदाब ग्राहकांची मागणी जास्त असल्यामुळे व इतरत्र वीजभार शिल्लक नसल्यामुळे महावितरणला या ग्राहकांचा वीजपुरवठा पुढील नियोजन होईपर्यंत नाईलाजाने बंद ठेवावा लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com