पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरापासून जवळ असलेल्या आळंदी पोलीस स्टेशन परिसरात रसायन वापरून देशी दारू तयार करण्यात येत होती. आरोग्यास हानिकारक असलेली ही दारू बनविण्याचा कारखाना सुरु होता. पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकत जेसीबी मशीनच्या सहाय्याने कारखाना उध्वस्त केला आहे. दरम्यान या ठिकाणी कोणीही सापडून आले नाही.
पिंपरी चिंचवड शहरापासून जवळ असलेल्या आळंदी पोलीस स्टेशन हद्दीतील कोयाळी रोड येथील कंजारभाट वस्ती परिसरात देशी दारू बनविण्याचा कारखाना सुरु होता. उघड्यावर हा कारखाना सुरु असून याठिकाणी रसायन टाकून दारू तयार करत विकली जात होती. यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे येथे छापा टाकून गुन्हे शाखा क्रमांक तीन पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
आळंदी पोलीस स्टेशन हद्दीतील कोयाळी रोड येथील कंजारभाट वस्ती या ठिकाणी मोरवती राजपूत ही महिला रसायनापासून देशी दारू तयार करण्याचा कारखाना चालवत आहे. अशी गोपनीय माहिती पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा क्रमांक तीनला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत मोरवती राजपूत हिच्या विरोधात आनंदी पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र प्रोव्हिजन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
तीन हजार लिटर रसायन नष्ट
पिंपरी चिंचवड पोलिसांनी या कारखान्यावर धाड टाकत कारवाई केली आहे. याठिकाणी देशी दारू बनविण्यासाठी असलेल्या जवळपास दीड लाख रुपये किमतीचा लोखंडी ड्रममध्ये साठवून ठेवलेला तीन हजार लिटर रसायन पोलिसांनी जेसीबी मशीन लावून उध्वस्त केले आहे. दरम्यान या कारवाईत कोणीही ताब्यात घेण्यात आले नसून कारखाना चालविणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.